Google Pixel 2 वर १ रुपयांत मिळेल १२०० चा हॅन्डसेट...

गूगलने काही दिवसांपूर्वीच  Google Pixel 2 आणि Google Pixel 2 XL हे दोन स्मार्टफोन बाजारात सादर केले होते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 28, 2017, 05:49 PM IST
Google Pixel 2 वर १ रुपयांत मिळेल १२०० चा हॅन्डसेट...  title=

नवी दिल्ली : गूगलने काही दिवसांपूर्वीच  Google Pixel 2 आणि Google Pixel 2 XL हे दोन स्मार्टफोन बाजारात सादर केले होते. या दोन्ही फोनची परी बुकिंग गुरुवारपासून सुरु झाली आहे.  ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर देखील हे फोन उपलब्ध आहेत. या फोन्ससोबत अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे ११,९९० रुपयांचा हॅन्डसेट केवळ १ रुपयात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. 

जाणून घ्या काय आहे ऑफर :
Google Pixel 2 आणि  Google Pixel 2 XL हे स्मार्टफोन्सची परी ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ११,९०० रुपयांचा Sennheiser हॅन्डसेट केवळ १ रुपयात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यासोबत २५००० रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआई ऑफर देखील उपलब्ध आहे. पेमेंट करण्यासाठी जर ग्राहक एक्सिस बँक बज क्रेडीट कार्ड वापरणार असतील तर त्यावर ५ % ऑफ देण्यात येणार आहे. तसंच एचडीएफसीच्या बँक क्रेडीट कार्डने पेमेंट करणार असल्यास ८००० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. 

Google Pixel 2 आणि Google Pixel 2 XL ची किंमत :
Google Pixel 2 च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ७०००० रुपये आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ६१००० रुपये आहे. Google Pixel 2 XL च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ८२००० रुपये आहे.  
Google Pixel 2 ला किंडा ब्लू, जस्ट ब्लॅक आणि क्लियरली व्हाइट कलर व्हेरियंट उपलब्ध करून दिला जाईल. Google Pixel 2 XL जस्ट ब्लॅक आणि क्लियरली व्हाइट कलर व्हेरियंट उपलब्ध केला जाईल.