मोबाइल बँकिग करताना सावधान, सॅमसंग, वनप्लससह गुगल पिक्सल वापरणाऱ्या युजर्संना सरकारचा इशारा

Government Warning On Android Phone: सरकारने Google Pixel, Samsung आणि OnePlus स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ऑनलाइन बँकिंग करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 11, 2023, 02:04 PM IST
मोबाइल बँकिग करताना सावधान, सॅमसंग, वनप्लससह गुगल पिक्सल वापरणाऱ्या युजर्संना सरकारचा इशारा title=
Government Warning For Mobile Banking Samsung Oneplus Google Pixel Users Based Old Android Os

Government Warning On Android Phone: गुगल पिक्सल, सॅमसंग आणि वनप्लस स्मार्टफोनच्या युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीदेखील हे फोन वापरत असाल आणि ऑनलाइन बँकिग करत असाल तर तुमच्यासाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिक मंत्रालयाअंतर्गंत इंडियन कंप्युटर इमरजन्सी रीस्पन्स टीम (CERT-In) ने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. अँड्रोइड स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्समध्ये गुगल पिक्सल, सॅमसंग आणि वनप्लस ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड स्मार्टफोन यांसाठी धोकादायक ठरु शकते. या स्मार्टफोनमधील अनेक सुरक्षविषयक अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. स्मार्टफोन युजर्सच्या वैयक्तिक डेटाचा ऑनलाइन अॅक्सेस केला जाऊ शकतो असं समोर आले आहे. 

ऑनलाइन बँकिग करणाऱ्या युजर्ससाठी अलर्ट

एका रिपोर्टनुसार, भारत हे सर्वात मोठे डिजीटल मार्केट आहे. तसंच, ऑनलाइन पेमेंटसाठी अँड्रोइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या स्मार्टफोनवर गुगल ओनरशिप असलेल्या ओएस सिस्टम आहे. आयफोनव्यतिरिक्त बहुंताश लोक गुगल, सॅमसंग, वनप्लस आणि नथिंगसारख्या गुगल बेस्ड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. अशातच या सर्व स्मार्टफोनमधील लोकेशन, बँकिग डिटेलसह सर्व महत्त्वाची माहिती ट्रॅक केली जाऊ शकते. 

तुमचा स्मार्टफोन गुगल ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जन 11,12,12L, 13वर काम करत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. त्यामुळं तुमच्यासोबतही फ्रॉड किंवा सायबर क्राइमचा धोका निर्माण होऊ शकतो. यासगळ्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट करण्याची गरज आहे. अनेक जण वेळोवेळी फोन अपडेट करत नाहीत अशा लोकांसाठी धोकादायक ठरु शकते. सरकारने जुन्या व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनसाठी इशारा जारी केला आहे. 

अपडेट कसं कराल?

सगळ्यात पहिले तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग ऑप्शनमध्ये जा. त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट सेक्शनमध्ये जाऊन जर सॉफ्टवेअर अपडेट झाले नसेल तर तो लगेचच डाउनलोड करा.