Google Pay Split an expense News In Marathi: अनेकदा आपण मित्रांसोबत बाहेर जेवायला जातो आणि पार्टीचे बिल ही प्रत्येक वेळी तुम्हालाचं भरावे लागते. तसेच पार्टीच्या बिलाचे विभाजन करुन ते बील भरणे ही थोडं कष्टीचेच काम आहे. मात्र आता यापासून तुमची सुटका होऊ शकते. कारण सध्या वापरलं जाणार पेमेंट अॅप Google Pay ने एक नवीन फीचर आणलंय आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्राकडून सहज पैसे वसूल करु शकता. यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करु शकता.
गुगलने गेल्या महिन्यात गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये नवीन फीचरची घोषणा केली होती. यामध्ये स्प्लिट एक्स्पेन्स हे असे वैशिष्ट्य आहे. Google Pay च्या स्प्लिट एक्स्पेन्समुळे तुम्ही तुमच्या मित्रांसह रक्कम विभाजित करू शकता. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी करत असाल आणि तुम्ही पूर्ण पैसे दिले असेल.तर Google Pay तुम्ही भरलेली बिले तुमच्या मित्रासोबत आपोआप शेअर करेल.
SplitWise अॅप खर्च मागोवा घेण्याच्या दृष्टीने थोडा चांगला अनुभव आणि वैशिष्ट्ये देते. Google Pay अॅपवरील पे पर्याय पहा. तुम्हा फक्त स्प्लिट व्यय फीचरवर टॅप करायचंय. अकाऊंट एंटर करायचं आणि इतरांना त्वरित पेमेंटची रिक्वेस्ट मिळेल. ग्रुपमधील सर्व लोकांना वाट्याला जी काही रक्कम येईल, ती तुम्हाला Google Pay द्वारे पाठवले जातील. तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत आणि कोणाकडून जास्त पैसे मिळवायचे आहेत याची नोंद तुम्ही येथे ठेवू शकता. तुम्ही Splitwise वापरल्यास ते त्याच पद्धतीने काम करेल. तुम्ही स्प्लिटवाइज अॅपमध्येच संपूर्ण खर्च एकमेकांसोबत शेअर करू शकता.