जाणून घ्या २०२५ पर्यंत भारतीय इंटरनेटचा किती वापर करतील?

एका रिपोर्टनुसार, सर्वाधिक इंटरनेट वापण्याचं हे आहे कारण...

Updated: Jun 20, 2020, 03:16 PM IST
जाणून घ्या २०२५ पर्यंत भारतीय इंटरनेटचा किती वापर करतील? title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. जगात सर्वाधिक इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये भारताचा क्रमांक आहे. एका रिपोर्टनुसार, येणाऱ्या पाच वर्षात भारतीयांकडून इंटरनेटचा जबरदस्त वापर होणार आहे.

भारतातील प्रति व्यक्ती महिन्याचा इंटरनेट डेटा, 2025 पर्यंत 25 जीबीपर्यंत पोहचू शकत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2019 मध्ये प्रत्येक महिन्याला इंटरनेट डेटा वापरण्याचं प्रमाण 12 जीबी होतं, जागतिक स्तरावर हा इंटरनेटचा सर्वाधिक उपयोग आहे. टेलिकॉम उपकरणातील अग्रगण्य उत्पादक कंपनी एरिक्सनने जून २०२० च्या 'मोबिलिटी रिपोर्ट'मध्ये म्हटलं आहे की, देशातील स्वस्त मोबाइल इंटरनेट आणि लोकांना सतत व्हिडिओ पाहण्याची सवय असणं या गोष्टी सर्वाधिक इंटरनेट वापरण्याचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं.

'रपट'नुसार, देशात केवळ चार टक्के घरांमध्येच ब्रॉडब्रँड लाईन आहे. अशात इंटरनेटपर्यंत पोहचण्यासाठी स्मार्टफोनच प्रमुख मार्ग आहे. 'रपट'नुसार, देशात इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर सुरु राहणार आहे. 

जग कोरोनाने त्रस्त; पण भारतीय 'या' गोष्टी सर्च करण्यात व्यस्त

एरिक्सन मोबिलिटी रिपोर्टचे कार्यकारी संपादक आणि विपणन प्रमुख प्रतिक सरवाल यांनी सांगितलं की, देशात इंटरनेटचा वापर 2025 पर्यंत तिप्पट होऊन 21 ईबी (Exabyte) होण्याचा अंदाज आहे. याचं कारणं म्हणजे, ग्रामीण भागासह देशातील स्मार्टफोन वापरकर्त्यांची वाढती संख्या आणि प्रति स्मार्टफोनच्या सरासरी इतकं इंटरनेट वापरातील वाढ हे आहे.

तुम्ही दिवसाला किती वेळ ऑनलाईन व्हिडिओ पाहता; गुगलने रिलिज केला डेटा

 

त्यांनी सांगितलं की, देशात 2025 पर्यंत आणखी 41 कोटी स्मार्टफोन जोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2025 पर्यंत देशात प्रति व्यक्ती महिन्याचा डेटा वाढून तो 25 जीबी होण्याची शक्यता आहे.