भारतात Infinix ने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. या फोनचं नाव Infinix Smart 8 plus आहे. हा फोन सर्वांच्या खिशाला परवडणारा आहे. यामध्ये अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन यह फोन Mediatek Helio G36 2.2 GHz Octa-Core प्रोसेसरसह येतो.
Infinix Smart 8 plus ची किंमत 6999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत 4GB स्टोरेज आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. हा स्मार्टफोन तीन रंगाच्या व्हेरियंटमध्ये मिळत आहे. ज्यात गॅलॅक्सी व्हाईट, टिंबर ब्लॅक आणि शायनी गोल्ड आहेत.
Infinix Smart 8 plus मध्ये 6.6 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 90Hz Punch-Hole डिस्प्ले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये मॅजिक रिंगही देण्यात आली आहे, जी तुम्हाला iPhone 15 च्या Dynamic Island ची आठवण करुन देईल. यामध्ये युजर्सना गरजेची माहिती मिळणार आहे. ज्यात चार्जिंग स्टेटस, इन कॉल टाइम आणि बॅटरी टक्केवारी दिसते.
Infinix Smart 8 plus मध्ये MediaTek Helio G36 2.2 GHz Octa-Core प्रोसेसर मिळतो. यामध्ये 4GB स्टोरेज आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. यामध्ये 2 TB चा मायक्रोएसडी कार्ड लावू शकतो. तसंच MemFusion तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जो गरज पडल्यास 8GB व्हर्च्युअल रॅम अॅक्सेससची सुविधा देतो.