मुंबई : LG Laptop Latest News : LG या महिन्याच्या शेवटी युरोपमध्ये LG अल्ट्रा PC ब्रँड अंतर्गत आपला नवीन लॅपटॉप बाजारात लॉन्च करत आहे. LG Ultra PC मालिकेतील हे दोन प्रकारात उपलब्ध होणार आहेत. यात 14 इंच आणि 16 इंच या प्रकारात आहे. हे AMD च्या Ryzen प्रोसेसरद्वारे काम करणार आहेत आणि 16:10 IPS पॅनेल देतात. नवीन लॅपटॉपमध्ये हलके चेसिस आणि अनेक सुविधा आहेत. LG Ultra PC 14U70Q आणि LG Ultra PC 16U70Q दोन्ही त्यांच्या डिस्प्लेसाठी मॅट फिनिशला स्पोर्ट करतात. या दोन्हींना प्रीमियम ऑफर आहे.
LGचे हे Laptop आधुनिक प्रोसेसर व्यतिरिक्त साध्या डिझाइनसह येतात. नवीन लॅपटॉपसाठी Ryzen 5 5625U आणि Ryzen 7 5825U पर्याय उपलब्ध आहेत. AMD Ryzen 7 5825U हे 4.5GHz CPU क्लॉक स्पीडसह 16 थ्रेड्स असलेले 8-कोर मॉडेल आहे. नवीन LG अल्ट्रा पीसी सीरिजमध्ये दीर्घकाळ टिकणारी आणि टिकाऊ बॅटरी आहे. 72Wh बॅटरीमुळे वापरकर्त्यांना 21 तासांपर्यंत बॅटरी आयुष्याची खात्री दिली जाते.
LG Ultra PC 14U70Q 300 निट्स ब्राइटनेस देते तर 16-इंचाचे मॉडेल 250 एनआयटीवर ब्राइननेसवर आहे. दोन्ही लॅपटॉप 1,200 पिक्सेल रिझोल्यूशन असून यात 16GB LPDDR4X ड्युअल-चॅनल रॅम आहे. इनबिल्ड 1TB मेमरी आहे. HDMI, USB-A आणि USB-C पोर्ट आहेत आणि 14-इंच मॉडेल मोठ्या लॅपटॉपपेक्षा 300 ग्रॅम पर्यंत हलके आहे.
LG Ultra PC मालिकेच्या नवीन LG लाइनअपसाठी संपूर्ण किंमतीचा तपशील माहित नाही. मात्र, मॉडेल्स या महिन्यात उपलब्ध होतील आणि 14-इंच मॉडेलची सुरुवातीची किंमत €1,199 (96,173 रुपये) आहे, तर 16-इंच लॅपटॉपची सुरुवात €1,399 ( 1,12,149 रुपये) आहे. नवीन LG अल्ट्रा पीसी सीरीज लॅपटॉपच्या जागतिक उपलब्धतेबद्दल अद्याप कोणतेही तपशील मिळू शकलेला नाही.