नवी दिल्ली : मारूती सुझुकी या कार कंपनीने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन कार लॉन्च केली आहे. कंपनीने त्यांची लोकप्रिय S-Cross या कारचं नवं व्हर्जन लॉन्च केलंय. कंपनीने S-Cross मध्ये अनेक बदल केले आहेत.
कंपनीने नवीन S-Cross ला ४ वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये बाजारात दाखल केलं आहे. या कारची किंमत ८.४९ लाख रूपयांपासून सुरू होते.
नव्या S-Cross कारची लांबी ४३०० मिलीलीटर, उंची १५९५ मिलीलीटर आणि रूंदी १७८५ मिलीलीटर इतकी आहे. कारची पावर ६६ kW@4000rpm इतकी आहे. तर ही कार जास्तीत जास्त 200 Nm@1750 rpm चा टॉर्क जनरेट करते.
मारूतीने नवीन S-Cross ला ५ वेगवेगळ्या रंगांमध्ये बाजारात आणलंय. यातील नेक्सा ब्लू हा पूर्णपणे नवीन रंग आहे. यासोबतच पर्ल आर्कटिक व्हाईट, कॅफिन ब्राऊन, प्रिमियम सिल्व्हर आणि ग्रेनाईट ग्रे रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे.
नवीन S-Cross ही कार ४ वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. पहिलं व्हेरिएंट Sigma असून या कारची किंमत ८.४९ लाख रूपये इतकी आहे. तसेच Delta व्हेरिएंटची किंमत ९.३९ लाख रूपये, Deltaची किंमत ९.९८ लाख रूपये आणि Alpha ची किंमत ११.२९ लाख रूपये ठरवण्यात आली आहे.
मारूतीने S-Cross ही कार २०१५ मध्ये लॉन्च केली होती. तेव्हापासून आतापर्यंत या मॉडेलच्या ५३ हजार गाड्या कंपनीने विकल्या आहेत. तर ४ हजार ६०० गाड्या निर्यातही केल्या आहेत.