नवी दिल्ली : अलीकडे फोनच्या स्फोटामुळे जखमी होण्याच्या दुर्घटना कानी येत आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फोनचा स्फोट होऊन व्यक्तीच्या शर्टाच्या खिशाला अचानक आग लागते. हा सॅमसंग ग्रँड ड्युओस फोन होता.
डेली मेलच्या वृत्तानुसार इंडोनेशियाच्या हॉटेलमध्ये ४७ वर्षीय हॉटेल सुपरव्हायजर उभे होते. तेव्हा त्यांना फोनमध्ये काहीतरी वेगळे होत असल्याचे जाणवले. म्हणून त्यांनी फोन काढण्यासाठी मोबाईलमध्ये हात घातला. तितक्यातच फोनचा स्फोट झाला. शर्टाला आग लागली. एक व्यक्ती ताबडतोब मदतीसाठी धावून आला आणि लगेचच यूलिआंतोला शर्ट काढण्यास मदत केली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. ही संपूर्ण दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद्द झाली आहे.
सॅमसंग ग्रँड ड्युओस हा फोन २०१३ मध्ये लाँच झाला आहे. अलीकडेच गॅलॅक्सी नोटचा स्फोट झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर कंपनीने सर्व फोन परत मागवले आणि त्याचे उत्पादन बंद केले.