Mobile Tips: तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी कुठे आणि किती खर्च होते? असं तपासा

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ अशा प्रकारे तपासू शकता. कोणते अ‍ॅप किती बॅटरी वापरते ते जाणून घ्या

Updated: Aug 4, 2022, 05:05 PM IST
Mobile Tips: तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी कुठे आणि किती खर्च होते? असं तपासा title=

Smartphone Tips: तुम्ही महागडा फोन घेतला आणि त्याची बॅटरी कमी काळ टिकणारी असेल तर वैताग येतो. कारण धावपळीच्या युगात थोड्या थोड्या वेळाने स्मार्टफोन चार्ज करणं शक्य नाही. त्यामुळे एकदा बॅटरी चार्ज केली की दिवसभर चालेल, असा फोन घेण्याकडे कल असतो. असं असलं तरी काही काळानंतर तुम्हाला फोनच्या बॅटरीमध्ये समस्या येऊ लागतात. कधी कधी फोन चार्ज होण्यासाठी बराच वेळ घेतो तसेच बॅटरी पूर्वीपेक्षा कमी वेळ टिकते. तुम्हालाही अशाच समस्या येत असेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ अशा प्रकारे तपासू शकता. कोणते अ‍ॅप किती बॅटरी वापरते ते जाणून घ्या. 

सेटिंगमध्ये जाऊन असं सर्च करा

सर्व अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरीची स्थिती पाहण्याची परवानगी असते. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन तुमच्या फोनमध्ये किती बॅटरी शिल्लक आहे किंवा कोणते अ‍ॅप जास्त बॅटरी घेत आहे हे पाहू शकता.

  • बॅटरीची स्थिती तपासण्यासाठी, तुमच्या स्मार्टफोनवर सेटिंग्ज अ‍ॅप उघडा.
  • त्यानंतर बॅटरी सेक्शनमध्ये जा.
  • तुम्हाला थ्री डॉट आयकॉनवर क्लिक करावे लागेल. 
  • काही फोनमध्ये तुम्हाला Data Usage चा पर्याय मिळेल.
  • येथे तुम्हाला सर्व अ‍ॅप्सची सूची दिसेल जी बॅटरी वापरत आहेत.
  • अ‍ॅपच्या नावापुढे कोणते अ‍ॅप किती टक्के बॅटरी वापरत आहे हे देखील दिसेल.
  • तुम्ही तुमच्या सोयीनुसार अ‍ॅपच्या नावावर क्लिक करून अ‍ॅप बंद करू शकता.

डायल कोडद्वारे बॅटरी तपासा

सिक्रेट कोड डायल करून तुम्ही अँड्राईड फोनच्या डायग्नोस्टिक्स फंक्शनध्ये जाऊ शकता. यात नंबर आणि हॅशचा समावेश असतो.  सर्व प्रथम फोन अॅप उघडा. त्यानंतर *#*#4636#*# डायल करा . टेस्टिंग मेनूचा एक पॉप-अप दिसेल. येथे तुम्हाला बॅटरीचा माहिती मिळेल. 

थर्ड पार्टी अ‍ॅप वापरा

  • तुम्ही AccuBattery सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप देखील वापर करू शकता.
  • तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
  • अ‍ॅप इंस्टॉल करा. येथे तुम्हाला अनेक टॅब मिळतील.
  • यामध्ये चार्जिंग, डिस्चार्जिंग,हेल्थ आणि हिस्ट्री समाविष्ट आहे.
  • तुम्ही हेल्थ टॅबवर जाऊन बॅटरीची टक्केवारी पाहू शकता. 
Tags: