Netflix च्या नव्या फीचरने दर महिन्याला रिचार्ज करायचं टेन्शन संपलं

दर महिन्याला आता रिचार्ज करण्याची गरज नाही... का आणि कसं पेमेंट होणार वाचा सविस्तर

Updated: Aug 31, 2021, 10:32 PM IST
Netflix च्या नव्या फीचरने दर महिन्याला रिचार्ज करायचं टेन्शन संपलं title=

मुंबई: नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी नेटफ्लिक्सने खास सेवा सुरू केली आहे. यामध्ये कार्ड पेमेंटमध्ये डेबिट कार्ड पेमेंटला ऑटो पेमेंट पर्याय उपलब्ध आहे. मात्र आता नेटफ्लिक्सने अखेर UPI ऑटो पेमेंट देखील लाँच केलं आहे. याचा फायदा अनेक युझर्सना होणार आहे. त्यामुळे आता तुमचं नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन बंद होणार नाही तर ऑटो पे होत राहिल्यानं हे सुरूच राहिलं. 

नेटफ्लिक्सवर जर तुम्हाला UPI ऑटो पे हा पर्याय ठेवायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल आज हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्ही ऑटो पे सुरू ठेवू शकता आणि खंड न पडता नेटफ्लिक्स वापरण्याचा आनंद घेऊ शकता. 

UPI ऑटो पे वैशिष्ट्य नेटफ्लिक्स अँड्रॉइड युझर्ससाठी आणि netflix.com वर उपलब्ध असेल आणि नवीन आणि नव्या नियमानुसार अॅन्ड्रॉइड युझर्स आणि वेब युझर्स दोन्ही हा पर्याय वापरू शकतात.

सर्वात आधी गुगलवर जाऊन नेटफ्लिक्स अकाऊंट लॉगइन करा. जर तुमचं अकाऊंट असेल तर त्यावर तुम्ही इमेल आणि पासवर्ड टाका. तिथे पेमेंट किंवा बिलिंग पर्याय निवडा. तुमची आताची पद्धत बदलून UPI पेमेंट पर्याय निवडा. 

नवीन युझर्स असाल तर ब्राउझरसाठी 499 रुपये, 699 रुपये आणि 799 रुपये किंवा मोबाईल प्लॅनसाठी 199 रुपये निवडावे लागतील.
पेमेंट पद्धतीबद्दल विचारले जाईल, जिथे तुम्ही UPI ऑटोपे पर्याय निवडू शकता. त्यानंतर पेटीएम किंवा UPI आयडी विचारला जाईल. तिथे तुमचा UPI आयडी अपलोड करा. 

ऑटोपे फीचरबद्दल बोलताना नेटफ्लिक्स इंडिया पेमेंट्सचे प्रमुख गुंजन प्रधान म्हणाले, “आम्हाला ग्राहकांना पूर्ण स्वातंत्र्य आणि नियंत्रण द्यायचे आहे. आम्हाला आशा आहे की UPI ऑटो पे सुविधेमुळे सदस्यांना पेमेंटच्या विविध सेवा मिळतील.