मुंबई : Samsung ही आघाडीची स्मार्टफोन निर्माती कंपनी भारतात Samsung Galaxy A13 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी फेब्रुवारीपर्यंत भारतात Samsung Galaxy A13 5G आणि Samsung Galaxy A33 5G हे स्मार्टफोन लॉन्च करू शकते.
Samsung ने Galaxy A13 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यापूर्वी Samsung Galaxy A12 ची किंमत कमी केली आहे. हा स्मार्टफोन आधी भारतात 13,999 रुपयांना विकला जात होता, जो आता 12,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
हा स्मार्टफोन 4GB आणि 6GB रॅम सह बाजारात आला आहे. कंपनीने दोन्ही व्हेरियंटच्या किमती कमी केल्या आहेत.
Samsung Galaxy A12 स्मार्टफोनच्या दोन्ही प्रकारांमध्ये 1000 रुपयांची कपात केली आहे. Samsung Galaxy A12 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 12,999 रुपयांना आणि 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट 15,499 रुपयांना खरेदी करता येईल.
Samsung Galaxy A12 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD + Infinity-V PLS TFT डिस्प्ले आहे. हा सॅमसंग फोन ऑक्टा कोर Exynos 850 प्रोसेसर सह सादर करण्यात आला आहे.
हा सॅमसंग फोन 4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.
कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy A12 स्मार्टफोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअपमध्ये 48MP + 5MP + 2MP + 2MP चे सेन्सर देण्यात आले आहेत. यासोबतच या फोनच्या फ्रंटमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
यासोबतच फोनमध्ये 5,000Ah बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.