Tata Tigor EV नव्या अवतारात, सिंगल चार्जमध्ये कापणार 315 किमी अंतर; जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये

Tata Tigor Updated Version: टाटा टिगोर इव्ही नव्या अवतारात लाँच झाली आहे. या इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये काही नवीन फीचर्स जोडण्यात आले आहे. तसेच सिंगल चार्ज रेंजमध्ये वाढ करण्यात आली आहे. फूल चार्जमध्ये 315 किमी अंतर कापू शकतो. 

Updated: Nov 23, 2022, 01:32 PM IST
Tata Tigor EV नव्या अवतारात, सिंगल चार्जमध्ये कापणार 315 किमी अंतर; जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये title=

2022 Tata Tigor EV Price and Features: टाटा मोटर्सनं गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन (Electric Car) क्षेत्रात कमालीची आघाडी घेतली आहे. टाटाच्या गाड्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा खप देखील वाढला आहे. ग्राहकांची गरज ओळखून टाटा मोटर्सनं (TATA Motors) टाटा टिगोर इव्ही नव्या अवतारात लाँच केली आहे. या गाडीत कंपनीने काही नवीन फीचर्स जोडले असून सिंगल चार्ज रेंजमध्येही वाढ झाली आहे. बॅटरी फूल चार्ज असताना 315 किमी अंतर कापू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. एकदा चार्च केली केली दिल्लीतून चंदीगडला आरामात जाऊ शकता. या गाडीची सुरुवातीची किंमत 12.49 लाख रुपये इतकी आहे. कंपनीने या मॉडेलमध्ये XZ+ LUX व्हेरियंटचा समावेश केला आहे. 

या फीचर्सचा समावेश 

टिगोर इव्हीमध्ये लेदरेट अपहोल्स्ट्री, लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी नवीन लक्झरी आणि आरामदायी फीचर्स दिले आहेत. आता ग्राहकांना नवीन मॅग्नेटिक रेड कलर ऑप्शनही मिळणार आहे. प्रवास सुलभ करण्यासाठी मल्टी-मोड रीजन, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, iTPMS आणि टायर पंक्चर दुरुस्ती किट यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात. कंपनी सध्याच्या टिगोर इव्ही मालकांना सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फीचर्सबाबत अपडेट देत आहे. वाहने मल्टी-मोड रीजनरेशन, iTPMS आणि टायर पंक्चर दुरुस्ती किटसह अपग्रेड करू शकतात. 20 डिसेंबर 2022 पासून टाटा मोटर्सच्या अधिकृत सेवा केंद्राला भेट देऊन ही सेवा घेता येईल.

 

बातमी वाचा- 'Matter'नं सादर केली 'गियर' असलेली इलेक्ट्रिक बाइक, पूर्ण चार्जवर कापणार इतकं अंतर

बॅटरी आणि पॉवर

टाटा टिगोर इव्हीमध्ये 26-kWh लिक्विड-कूल्ड, हाय एनर्जी डेन्सिटी बॅटरी आहे. हा एक IP67 रेटेड बॅटरी पॅक आहे. इलेक्ट्रिक मोटर 55 kW चे पीक पॉवर आउटपुट आणि 170 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. 

प्रत्येक व्हेरियंटची किंमत

टाटा टिगोरच्या प्रत्येक व्हेरियंटची किंमत जाणून घ्या. या सर्व किंमती एक्स शोरूम इतकी आहे. XE 1249000 रुपये, XT 1299000 रुपये, XZ+ 1349000 रुपये, XZ+ LUX 1375000 रुपये इतकी आहे.