TCL ने गुपचूप लॉंच केला 8 हजार रुपयांचा स्टायलिश Smartphone; भन्नाट फिचर्सने सुसज्ज

TCL ने उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी आहे. TCL 30 LE मध्ये 1560 x720 पिक्सेलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.1-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. TCL 30 LE चे अप्रतिम फीचर्स जाणून घेऊया...

Updated: Jul 6, 2022, 02:48 PM IST
TCL ने गुपचूप लॉंच केला 8 हजार रुपयांचा स्टायलिश Smartphone; भन्नाट फिचर्सने सुसज्ज title=

मुंबई : TCL ने उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी आहे. TCL 30 LE मध्ये 1560 x720 पिक्सेलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.1-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. TCL 30 LE चे अप्रतिम फीचर्स जाणून घेऊया...

लोकप्रिय टीव्ही निर्माता कंपनी TCL देखील स्मार्टफोनच्या बाजारात उतरली आहे. नुकतीच कंपनीने एक स्वस्त स्मार्टफोन लॉंच केला आहे.

कंपनीने यापूर्वी TCL 30 सीरीजचे फोन लॉन्च केले होते. आणि आता या मालिकेत नवीन फोन TCL 30 LE जोडला गेला आहे. या स्मार्टफोनची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. आता हा फोन अमेरिकेत लॉन्च करण्यात आला आहे. या एंट्री-लेव्हल स्मार्टफोनची किंमत $104 (सुमारे 8 हजार रुपये) आहे. TCL 30 LE चे अप्रतिम फीचर्स जाणून घेऊया...

TCL 30 LE Price

TCL 30 LE स्मार्टफोनची किंमत 104 डॉलर म्हणजेच 8 हजार रुपये आहे. अमेरिकेत हा स्मार्टफोन Verizon आणि Walmart च्या माध्यमातून उपलब्ध आहेत.

TCL 30 LE Specifications

TCL 30 LE ला 6.1 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. ज्याचा स्क्रीन रिझॉल्युशन 1560x720 पिक्सल आहे. या डिस्प्लेचे संचालन NXTVISION द्वारे होते. डिवाइस मीडियाटेक हेलिओ ए22 प्रोसेसर द्वारे संचालित आहे. ज्यामध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबीची इंटर्नल स्टोरेज आहे. एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे. ज्याला युजर 512 GB पर्यंत वाढवू शकतो. 

TCL 30 LE Camera

फोनच्या मागील बाजूस वरच्या-डाव्या कोपऱ्यात 13MP कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये फ्रंटला 8MP कॅमेरा सेन्सर देखील आहे. 

हे Android 12 ऑपरेटिंग सिस्टम आउट-ऑफ-द-बॉक्स चालवते. डिव्हाइसला 3,000mAh बॅटरीचा सपोर्ट आहे. आणि एका चार्जवर 24 तास वापरण्याची सुविधा देते.