नवी दिल्ली : दिवाळी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग कंपन्या नवनव्या ऑफर्स सुरु करतात. या वर्षी ३०,००० कोटींची शोपिंग केली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उद्योग मंडळातून एसोचैम तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती हाती आली आहे.
या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, दिवाळीच्या या सीजनमध्ये युजर्स मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कपडे, होम अप्लायंसेज अशा प्रकारच्या गोष्टींची शॉपिंग ऑनलाईन अधिक प्रमाणात करतात. एसोचैम चे महासचिव डीएस रावत यांनी सांगितले की, "इंटरनेटच्या उत्तम स्पीडमुळे या वर्षी छोट्या शहरात देखील मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन शॉपिंग करण्यात आली."
हे सर्वेक्षण देशातील १० मुख्य शहरात करण्यात आले. मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, बेंगलुरु, चंडीगड आणि डेहराडून या शहरांचा समावेश होता. या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, ऑनलाईन खरेदी करण्यात ६५% पुरुष आणि ३५% महिलांचा समावेश आहे. याशिवाय या उत्सवाच्या काळात २५ ते ३४ वयोगटातील पुरुष आणि महिल अधिक सरस आहेत. यात देखील मुलींची संख्या अधिक आहे.
एसोचैम यांनी सांगितले की, खरेदी करण्यात दिल्ली, मुंबई आणि बंगरूळ ही शहरे पुढे होती. पुणे, गुरुग्राम, नोएडा, चंडीगढ़, नागपुर, इंदौर, जयपुर आणि विशाखापट्टनम ही शहरे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शहरातून ६० ते ६५% इतका लाभ झाला आहे.