WhatsApp Update: व्हॉट्सअॅप हे आजच्या पिढीसाठी खूप गरजेचे झाले आहे. ऑफिसच्या कामांसाठी ते पर्सनल चॅटिंगसाठीहे व्हॉट्सअॅप खूप उपयुक्त पडते. युजर्सना व्हॉट्सअॅप हाताळणे खूप सोप्पे जावे यासाठी मेटाकडून अनेक नव नवीन अपडेट सतत येत राहतात. कंपनी दर सहा महिन्यातून एकदा तरी एक नवीन अपडेट घेऊन येत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वीच Android युजर्ससाठी UIला रिडिजाइन केले आहे. गेल्या काहि दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर तुम्हाला नवीन सर्च बार आणि Meta AIचे फिचर दिसत आसेल. काही युजर्सना अद्याप Meta AIचे फिचर मिळालेले नाहीये.
आता WhatsApp ने आणखी एक नवीन फिचर आणले आहे. हे फिचर चॅट फिल्टर म्हणून काम करते. मेटाच्या इन्संट मॅसेजिंग प्लॅटफॉर्मने एका ब्लॉग पोस्ट जारी करत या फिचरची माहिती दिली आहे. काय आहे हे फिचर आणि कसं काम करते हे फिचर याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Meta चे CEO Mark Zuckerberg ने चॅट फिल्टर फिचरच्या लाँचची माहिती दिली आहे. या फिचरमुळं तुम्ही सहजपणे तुमचे सगळे मेसेज फिल्टर करु शकणार आहेत. या फिचरमुळं कोणतेही चॅट ओपन करण्याचा वेळ वाचणार आहे. कंपनी तुम्हाला पर्सनल आणि ग्रुप चॅट फिल्टर करण्याचा पर्याय देणार आहे.
हे फिचर लाँच करण्याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप चॅट्स अॅक्सेस करणे सोप्पे जाणार आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुप आणि पर्सनल अनरीड मेसेज पाहण्यासाठी व्हॉट्सअॅप खूप जास्तवेळी स्क्रोल करावे लागते. इनबॉक्समध्ये चॅट्स स्क्रॉल करावे लागते. मात्र, आता त्यासाठी तु्म्हाला फिल्टर मिळणार आहे. ज्यामुळं तुम्हाला एकाच ठिकाणी ग्रुप चॅट्स पाहू शकणार आहेत.
कसं काम करते हे फिचर?
WhatsApp ने तीन डिफॉल्ट फिल्टर आणले आहेत. ज्यात तुम्ही तुम्हाला हवे असलेले conversation अॅक्सेस करु शकणार आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला ios किंवा Android स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप सुरू करावे लागणार आहे. फक्त लक्षात असू द्या की तुमचे व्हॉट्सअॅप अपडेटेड आहे. आता तुम्हाला टॉपवर देण्यात आलेल्या तीन फिल्टरवर क्लिक करावे लागणार आहे. तिथे तुम्हाला All, Unread आणि Groups चा पर्याय मिळणार आहे.
ALL फिल्टरमध्ये तुम्हाला सर्व चॅट्स दिसणार आहेत. तर ग्रुप फिल्टरमध्ये सर्व ग्रुप दिसणार आहेत. या प्रकारे तुम्ही सर्व अनरिड चॅ्ट्स फिल्टर सिलेक्ट करु शकणार आहेत. त्यानंतर तुम्हाला सर्व अनरिड चॅट्स दिसणार आहेत.