13 वर्षांनी विराट कोहली खेळणार रणजी ट्रॉफी मॅच, फ्री मध्ये कुठे पाहू शकता Live?

Virat Kohli Ranji Trophy Match : रणजी ट्रॉफीतील दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध झाली आहे. फ्री मध्ये सामना कुठे पाहता येईल याविषयी जाणून घेऊयात. 

पुजा पवार | Updated: Jan 29, 2025, 12:54 PM IST
13 वर्षांनी विराट कोहली खेळणार रणजी ट्रॉफी मॅच, फ्री मध्ये कुठे पाहू शकता Live? title=
(Photo Credit : Social Media)

Virat Kohli Ranji Trophy Match : टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) तब्बल 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2025) सामन्यात खेळताना दिसणार आहे. गुरुवारी दिल्ली विरुद्ध रेल्वे या दोन संघात होणाऱ्या सामन्यात विराट दिल्ली संघाकडून खेळताना दिसेल. विराटने शेवटचा सामना 2012 मध्ये गाजियाबाद उत्तर प्रदेशच्या संघाविरुद्ध खेळला होता. विराट अनेक वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट सामना खेळणार असल्याने त्याचे चाहते विराटची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तेव्हा रणजी ट्रॉफीतील दिल्ली विरुद्ध रेल्वे (Delhi VS Railway) यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध झाली आहे. फ्री मध्ये सामना कुठे पाहता येईल याविषयी जाणून घेऊयात. 

विराट कोहलीचा खराब फॉर्म : 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात असून नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या बॅटमधून केवळ एक शतक निघालं मात्र त्यानंतर त्याची बॅट उर्वरित सर्व सामन्यांमध्ये थंडच राहिली. रणजी ट्रॉफीनंतर विराटला इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. त्यामुळे रणजीमध्ये चांगलं परफॉर्म करून खराब फॉर्ममधून बाहेर येण्याची संधी विराटकडे आहे. 

विराटचं रणजी ट्रॉफी करिअर : 

विराट कोहलीने आतापर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये एकूण 23 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये 50.77 च्या सरासरीने 1574 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 शतक देखील लगावली आहेत. 

हेही वाचा : कोण ठरले भारताच्या पराभवाचे गुन्हेगार? 'या' 3 कारणांमुळे राजकोटमध्ये हारली सूर्या अँड कंपनी

सामना कुठे पाहता येणार Live? 

फिरोजशाह कोटला ग्राउंडवर दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला जाईल. गुरुवार 30 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स 18 नेटवर्क च्या चॅनेलवर दाखवलं जाईल. तसेच प्रेक्षक जिओ सिनेमा अँप तसेच वेबसाईटवर हा सामना फ्रीमध्ये लाईव्ह पाहू शकता.