मुंबई : आपल्यापैकी जवळपास सर्वचजण व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्याच्या स्थितीत व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जवळपास १ अरबच्या घरात आहे.
व्हॉट्सअॅपची सुविधा ही अगदी मोफत आहे मात्र, मोफत सुविधा देणाऱ्या व्हॉट्सअॅपवर कुठलीच जाहिरात आपल्याला पहायला मिळत नाही. तर मग, व्हॉट्सअॅपची कमाई नेमकी होती कशी? हा प्रश्न अनेकांना पडतो.
तुम्हालाही प्रश्न पडला असेल की व्हॉट्सअॅपची कमाई अखेर होते तरी कशी? पण काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यासंदर्भातील माहिती...
व्हॉट्सअॅप हे फेसबुकने खरेदी केलं आहे. २०१४ मध्ये १९ अरब डॉलर्समध्ये व्हॉट्सअॅप खरेदी केलं होतं. आता मायक्रो अॅडव्हर्टायझिंगचं बोलायचं झालं तर फेसबुकला तुमच्याबाबत खूप काही माहिती असते. याच माहितीचा वापर कंपनी आपल्या कमाईसाठी करते.
व्हॉट्सअॅपचा डेटा फेसबुक पाहू शकतं आणि तुम्हाला केवळ आणि केवळ त्याच प्रोडक्टची जाहिरात दाखवू शकतो ज्या प्रोडक्ट्सची तुम्हाला गरज आहे. मात्र, तुमच्या व्हॉट्सअॅपमधील मेसेजेस कंपनी वाचत नाही असा दावा व्हॉट्सअॅपने केला आहे.
अनेकदा तुम्ही आपल्या मित्रांना एखाद्या प्रोडक्टची लिंक शेअर करता आणि त्याचप्रमाणे तुमचे मित्रही अशाच प्रकारची एखाद्या प्रोडक्टची लिंक तुमच्यासोबत शेअर करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फेसबुकला कळतं की तुम्हाला नेमकं काय हवं आहे.
तसेच इतर दुसऱ्या कंपन्यांना तुमची माहिती विकूनही फेसबुक पैसे कमवतं. याचा अर्थ तुमची वैयक्तीक माहिती विकली जात नाही. तर, तुम्ही एखादं अॅप डाऊनलोड करता त्यावेळी तुम्ही अटी आणि शर्थी मंजूर करता. अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअॅपच्या लीगल पेजवर विझिट करु शकता.