मुंबई: तुम्ही असं ऐकलं असेल की एका नंबरवरुन फोन आला आणि त्यानंतर फोनचा स्फोट झाला. चार्जिंगला फोन लावल्यानंतर फोनचा स्फोट झाला. मोबाईलमध्ये स्फोट का होतो याची कारण समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक काही वेळा युजर्सच्या चुकीमुळे मोबाईलला आगही लागते. अशीच एक घटना मध्य प्रदेशात घडली असून मोबाईलची रिंग वाजताच फोनचा स्फोट झाला.
मोबाईल स्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार Xiaomi चा स्मार्टफोन ब्लास्ट झाला असून या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. एका ग्राहकाने दुकानदाराकडे फोन दुरुस्तीसाठी दिला होता. त्या दुकारदाराने सांगितले की, स्मार्टफोनची बॅटरी फुगली होती म्हणून दुरुस्तसाठी मोबाईल दिला होता. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, त्या मोबाईलवर कॉल आला आणि त्याने हँडसेट उचलताच मोबाईलचा स्फोट झाला. बॅटरीमध्ये स्फोट झाल्यानंतर फोनने पेट घेताच दुकानदाराने मोबाईल बाहेर फेकून दिला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
स्मार्टफोनचा स्फोट किंवा आग लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वेळा फोनमध्ये स्फोट झाले आहेत. असे अपघात टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आपल्या छोट्या-छोट्या चुकांमुळे असे अनेकदा अपघात घडतात.
स्मार्टफोनचा स्फोट का होतो?
- स्मार्टफोनला जास्त चार्ज करणे देखील तुम्हाला महागात पडू शकते. बॅटरी जास्त चार्ज केल्याने देखील स्फोट होऊ शकतो.
- वेगवान चार्जर देखील याचे कारण असू शकते. मात्र ज्या फोनमध्ये कंपन्या फास्ट चार्जिंग, कुलिंगची व्यवस्था करतात. अशा स्थितीत तुम्ही फास्ट चार्जरने सामान्य चार्जिंग सपोर्ट असलेला फोन चार्ज केल्यास अपघात होऊ शकतो.
- अनेकांना सवय असते की ते फोन चार्जमध्ये असतानाच वापरतात. स्मार्टफोन चार्ज होत असताना जास्त प्रमाणात गरम होत असतो. नेमक त्याचवेळी फोन आला आणि हँडसेट वापरून फोन उचला तर अपघात होऊ शकतो.
- लोकल बॅटरी वापरणे देखील धोकादायक ठरू शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये लोकल बॅटरीमुळे अपघात झाले असल्याची माहिती आहे.