ठाणे : राज्यासह ठाणे जिल्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून हळूहळू ठाण्यातील पालिका हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटल मध्ये भरती सुरू झाली आहे.
एकप्रकारे ही चिंतेची बाब असून आतापर्यंत शहरातील कोरोनावर उपचार करणारे हॉस्पिटल 70 टक्के फुल्ल झाले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी जिल्ह्या प्रशासन आणि पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सुचनेनुसार शहरात योग्य ती खबरदारी घेण्यात येत असली तरी मात्र शहरात रुग्ण वाढीची संख्या झपाट्याने वाढत आहे.
पालिका प्रशासन योग्य उपयोजना करत आहे. रूगांची संख्या वाढत असून काळजी करण्याचे कारण नाही,प्रत्येक रुग्णाला उपचार मिळाले हा हेतू आमचा असून पालिकेने दिलेल्या सर्व नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
येत्या काही दिवसांत पार्किंग प्लाझा येथेही 1 हजार बेड ची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या औषध, बेड व ऍम्ब्युलन्स तसेच लसीची कसलीही कमतरता नाही तरी लोकांनी करोनाचे नियम पाळावे असे आव्हान पालिका अधिकाऱ्यांनी ठाणेकरांना केले आहे .
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवू नये यासाठी मार्गदर्शनाखाली पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून महापालिका क्षेत्रात 4221 कोविड बेडसची क्षमता निर्माण करण्यात आली आहे.
यामध्ये ठाणे महापलिकेचे ग्लोबल रुग्णालय हे 1 हजार बेड चे असून त्यामध्ये अवघे 215 बेड शिल्लक आहेत. तर सिव्हिल रुग्णालयात 30 टक्के बेड रिकामे आहे.
दरम्यान ठाण्यातील खासगी रुग्णालये देखील 60 टक्के बेड भरले आहेत. त्यामुळे एकप्रकारे चिंताजनक बाब समोर आली आहे.
ठाणे शहरात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे 80 टक्के रुग्ण होम कोरोटाईन आहेत. ज्या रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत त्या रुग्णांना होम कोरोटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच प्रामुख्याने या रुग्णामध्ये तरुण वर्गाचा जास्त समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्यांना किरकोळ आजार आहेत अशा जेष्ठ नागरिकांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.