पुणे: डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याची शनिवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. अंदुरेला येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. तर अमित देगवेकर आणि राजेश बंगेरा यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे प्रमुख आरोपी आहे. तर दाभोलकर हत्येत सहभागी असल्याच्या संशयावरून कर्नाटक एसआयटीच्या अटकेत असलेले अमोल देगवेकर आणि राजेश बंगेरा यांचा ताबा सीबीआयला मिळाला. देगवेकर आणि बंगेरा गौरी लंकेश हत्या प्रकरणातले आरोपी आहेत. बंगेराने शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले. तर दाभोलकर हत्येचा कट रचण्यात अमित देगवेकर अग्रेसर होता.
तसेच देगवेकर वीरेंद्र तावडेच्या संपर्कात होता असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. याशिवाय आणखी काही आरोपी डॉक्टर दाभोलकर खुनात सहभागी आहेत. हे सगळे आरोपी एकत्र आणले गेल्यानंतर दाभोलकर हत्याप्रकरणाचा उलगडा होऊ शकतो.