मुंबई : लग्नाचे मुहूर्त काही दिवसांवर आले आहेत. लग्न समारंभांवर करोडो रुपये खर्च करायला काहीजण मागेपुढे पाहत नाहीत. पण या ७ टीप्स वापरून तुम्ही लग्नाचा खर्च थोडाफार नक्की कमी करु शकता.
लग्नातील पेहराव भाड्याने घेऊन लग्नातील मोठा खर्च वाचू शकतो. लग्नासाठी घेतलेला ड्रेस बऱ्याचदा पुन्हा घातलाच जात नाही. एकदा घालून पैसे फूकट जाण्यापेक्षा भाड्याने घेतल्या कमी किंमतीत आकर्षक ड्रेस घेऊ शकता.
ज्वेलरी भाड्याने घेण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. यामूळे वधूला स्वस्तामध्ये डिझायनर ज्वेलरी वापरता येते. ऑनलाईन पोर्टल्सवर १५०० पासून १५००० पर्यंतच्या रेंजमध्ये ब्राइडल ज्वेलरी भाड्याने मिळते.
वेडिंग कार्डऐवडी ऑनलाईन वेडिंग कार्डचा उपयोग करता येईल. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पारंपारिक पत्रिकांची पद्धत हळूहळू मागे पडत आहे.
पर्सनलाइज्ड ई-इन्वाइट्स ,वेबसाइट्स किंवा व्हिडिओच्या माध्यमातून निमंत्रण देता येऊ शकते.
सजावट कमी करुन पैसे वाचवता येऊ शकतात. महागातल्या फूलांऐवजी स्वस्त फूलं, फॅब्रिक आणि लाईटचा उपयोग करता येईल. यानेही सजावट चांगली दिसते.
लग्नाचा खर्च कमी करण्यासाठी ऑफ सीझनमध्ये लग्न करु शकता. याने बऱ्यापैकी बचत होते. त्यावेळी हॉटेल्स आणि बॅंक्विट्सदेखील ऑफर्स देतात.
लग्नातील जेवणात इंटरनॅशनल डिश ठेवण्यापेक्षा भारतीय पदार्थ ठेवावे. खाण्यापिण्यात चांगली रक्कम वाचू शकते.
जास्त इंटरनॅशनल आयटम्स टाकल्यास प्रति डिश किंमत वाढत जाते. भारतीय पदार्थांची डिश ३५ % इतक्या फरकाने स्वस्त मिळते.
महागातल्या हॉटेलपेक्षा ओपन स्पेसमध्ये लग्न करा. एका वेडिंग प्लानिंग कंपनीच्या मते, लग्नासाठी शहरातील मोठे हॉटेल्स ऐवजी शहराबाहेरचे हॉटेल निवडू शकता.
यामूळे हॉटेलचा खर्च कमी होऊ शकतो. फाईव्ह स्टार हॉटेल्स लागणाऱ्या ३५ ते ४० % टॅक्स पेक्षा ओपन स्पेस ग्राऊंडमध्ये लग्न केल्यास १० ते १५ टक्केच टॅक्स द्यावा लागेल.