मुंबई : अनेकदा लग्नानंतर लगेचच महिलांना लवकर आई व्हायचे नसते अशावेळेस त्यांची वैयक्तिक कारणे असू शकतात. पण त्या दरम्यान महिला गर्भवती (pregnant) राहतात मग अशावेळेस महिला नको असलेली प्रेगनेन्सी गर्भनिरोधक औषधांचा (Contraceptive drugs) वापर करुन टाळतात. अनेकदा ती औषधं योग्य वेळेस काम करत नाही अशाने गर्भ राहतो आणि मग जोडपी गर्भपात करायचा निर्णय घेतात. (Unwanted pregnancy An unsafe abortion can be life-threatening so plan ahead nz)
आपल्या देशात गर्भपाताबाबत एक कडक कायदा आहे, ज्यामध्ये तुम्ही किती काळ गर्भपात (Abortion) करू शकता हे सांगितले आहे. अशा काही महिला देखील आहेत ज्या स्वतः बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या खातात. असे केल्याने तुमच्या आरोग्याची मोठी हानी होऊ शकते.
काहीवेळेस जोडपी (couple) बेकायदेशीरपणे गर्भपातही करतात, त्यामुळे काही वेळा महिलेचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत गर्भपात करण्याचा सुरक्षित मार्ग कोणता आहे, गर्भधारणा झाल्यानंतर किती काळ गर्भपात केला जाऊ शकतो हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर आज आपण गर्भपातासंबंधातील माहिती जाणून घेणार आहोत...
औषधांद्वारे गर्भपात सुमारे 49 दिवस किंवा 7 आठवडे करता येतो आणि सर्जिकल गर्भपात 12 आठवड्यांपर्यंत म्हणजेच गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीपर्यंत करता येतो. 8-9 आठवड्यांच्या दरम्यान शस्त्रक्रिया करून गर्भपात करणे अधिक सुरक्षित मानले जाते. एवढेच नाही तर गर्भपाताच्या पद्धतीही अनेक घटकांवर अवलंबून असतात.
आजही बरेचसे लोक भारतात चुकीच्या पद्धतीने गर्भपात करायचा निर्णय घेतात आणि हे खूप घातक आहे. याच कारणामुळे भारतात गर्भपात करणे कायदेशीर केले आहे जेणेकरुन लोकं योग्य, सुरक्षित पद्धतीने, मेडीकल प्रोफेशनल आणि दवाखान्यातून गर्भपात करायचा निर्णय घेतील. जर तुम्ही गर्भपातासाठी अयोग्य मार्गाची निवड करत असाल तर तुम्हाला गर्भाशयात संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. हा संसर्ग रक्तात मिसळून महिलांची जीव जाण्याची शक्यता देखील जास्त असते.
जर तुम्हाला गर्भपात या प्रक्रियेपासून वाचायचे असल्यास तुम्हाला फॉमिली प्लॅनिंग (Family planning) करणे गरजेचे आहे. फॉमिली प्लॅनिंग संबंधातील योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला गर्भपात या प्रक्रियेला सामोरे जाण्याची गरज नाही.