मुंबई : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे, ती लोकांना जगण्याचे कारण देते. पण असे म्हटले जाते की प्रेम जितके सुंदर असते तितकेच ते वेदनादायक देखील असते कारण यात तुमची फसवणूक देखील होऊ शकते. त्यात काहींना तर एकच व्यक्तीसोबत प्रेम होत नाही. या अशा व्यक्तींची कालांतराने निवड बदलते अपेक्षा बदलतात, ज्यामुळे ते त्यांचे जोडीदार देखील बदलतात. तर काही लोकं तर एकाच वेळेस 2 ते 3 व्यक्तींसोबत देखील राहातात.
काही लोकं तर तुम्हाला असे ही मिळतील ज्यांना त्यांचंच काही माहित नसतं, कारण त्यांना एकाच वेळेला वेगवेगळ्या व्यक्तींसोबत प्रेम होतं आणि त्यांना दोन्ही व्यक्ती हव्या असतात. परंतु असं करत असताना ते समोरील व्यक्तींना फसवत असतात याची त्यांना जाणीव नसते, तर काही व्यक्ती जाणीवपूर्वक हे पाऊल उचलतात.
अशावेळी समोरील व्यक्तीला म्हणजे फसवणूक झालेल्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं तेव्हा त्यांची काय मानसिक स्थिती झाली असेल, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
आपली फसवणूक झाली आहे हे कळताच काही लोकं शांत बसतात आणि स्वत:लाच दोष देत बसतात, तर काही व्यक्ती आपल्या प्रियकराला अद्दल घडवण्याचा विचार करतात.
असाच एक प्रकार सध्या व्हायरल झाला आहे, या घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत ज्याची सर्वत्र चर्चा आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोत, तुम्ही पाहू शकता की एक माणूस भरचौकात उभा आहे. परंतु तो नुसताच उभा राहिलेला नाही तर, त्याने त्याच्या हातात एक बोर्ड पकडला आहे आणि त्या बोर्डवर जे लिहिले आहे ते वाचून तुम्हाला हसू येईल.
या व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेंडची फसवणूक केल्याचे दिसते, ज्याची शिक्षा तो अशा मनोरंजक आणि मजेदार मार्गाने भोगत आहे.
हा मजेदार फोटो Twitterhickzzz नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोत या बॉयफ्रेंडच्या हातात बॉर्डवर लिहिले आहे की, "मी गुरुवारी माझ्या गर्लफ्रेंडची फसवणूक केली आणि ही माझी शिक्षा आहे."
Absolute scenes at Liverpool Street this morning pic.twitter.com/mGVhjYn7fo
— H (@hickzzz) October 12, 2021
हा फोटोपाहून अनेक वापरकर्त्यांनी त्यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. या फोटोवर एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिले- 'दुसरी मैत्रीण शोध, भाऊ, ती तुला गळ्यात बोर्ड लावून रस्त्याच्या मधोमध उभे करणार नाही.' तर दुसऱ्याने लिहिले, 'फसवणूक करणे हे चूकिचे आहे त्यामुळे याच्या गर्लफ्रेंडने याला कधीही माफ करु नये.'