नवी दिल्ली : दाऊदचे आणि छोटा शकीलचे संबंध बिघडून दोघेही स्वतंत्रपणे गॅँग चालवत असल्याचे रिपोर्ट होते.
दाऊदशी संबंध बिघडल्यानंतर छोटा शकीलचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येता आहेत. टोळीयुद्धातून छोटा शकीलचा हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
छोटा शकीलबद्दल वेगवेगळ्या शक्यता आणि कहाण्या सांगितल्या जातायेत. याला निमित्त झालंय छोटा शकीलचा एक साथीदार, बिलाल याचं आणि मुंबईतल्या छोटा शकीलच्या एका नातेवाईकाचं फोनवरून झालेलं बोलणं. या संभाषणाची क्लीप हाती आली आहे. यात बिलालने छोटा शकीलचा मृत्यू झाल्याचं सांगितलय. या क्लीपची सत्यता मात्र अजून तपासली जायची आहे. दिल्ली आणि मुंबईतल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र यावर नक्की काही सांगता येणार नाही, असं म्हटलं आहे.
दुसऱ्या एका शक्यतेनुसार आयएसआयनेच छोटा शकीलची हत्या घडवून आणली आहे. दाऊद आणि छोटा शकील यांच्यात वितुष्ट
आल्यानंतर आयएसआयने त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यात यश आलं नाही. शेवटी त्यांनी छोटा शकीलचा काटा काढला. छोटा शकीलच्या हाताबाहेर जाण्याने आयएसआयच्या भारतविरोधी कारवायांना अडथळा येत होता. आणखी एका शक्यतेनुसार छोटा शकीलला ह्रद्यविकाराचा तीव्र झटका येऊन रावळपिंडीत मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतय.