Corona And H3N2 Virus : सध्या कोरोना आणि H3N2 रूग्णवाढीचा उद्रेक झाल्याने जगाची चिंता वाढली आहे. त्यातच आता आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोना पेक्षा भयानक महामारी येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. कारण, अमेरिका-चीन-युरोपच्या प्रयोगशाळेत जीवघेण्या व्हायरसची तयार होत असल्याची चर्चा आहे. द सन ऑनलाइनने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना महामारींनंतर जगभरात संशोधन करणाऱ्या प्रयोग शांळांची सख्या झपाट्याने वाढत आहे. याच प्रयोगशाळा जगासाठी डोकेदुखी ठरु शकतात. किंग्ज कॉलेज लंडनच्या तज्ज्ञांनी जगभरातील अशा 27 प्रयोगशाळांची माहिती दिली आहे. डॉ. फिलिपा लेंटझोस आणि डॉ. ग्रेगरी कोब्लांट्स यांनी याबाबतचा अहवाल सादर केला. सन 2021 नंतर अशा 10 प्रयोग शाळा सुरु झाल्या आहेत. या बायोसिक्युरिटी लॅब (BSL-4) आहेत. या प्रयोगशाळांमध्ये अत्यंत घातक आणि धोकादायक विषाणूंवर संशोधन सुरु आहे.
जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये घातक विषाणू, जीवाणूंवर संशोधन सुरू आहे. या प्रयोगशाळेतून भविष्यात कोरोनापेक्षा धोकादायक विषाणूंचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. BSL-4 प्रयोगशाळेत जैव सुरक्षा स्तर 4 इतका असतो. या प्रयोग शांळांमध्ये संशोधक, शास्त्रज्ञ सुरक्षित वातावरणात जगातील सर्वात घातक असलेल्या विषाणूंवर संशोधन करत असतात.
आशियामध्ये अशा 20 प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी 11 चीनमध्ये आहेत. यासह भारत, कझाकस्तान, तैवान, फिलीपिन्स, सौदी अरेबिया, सिंगापूर आणि जपानमध्ये देखील या प्रयोगशाळा आहेत. उत्तर अमेरिकेत 15 बायोलॅब आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये चार हायरिस्क प्रयोगशाळा आहेत.
विषाणूचा अभ्यास करण्यासाठी तसेच याचा फैलाव रोखण्यासाठी या प्रयोगशाळेत संशोधन केले जाते. एखादा व्हायरस फैलावल्यास कोणती खबरदारी घेता यावी यासह इतर मुद्यांवर या प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरू असते. या खास प्रयोगशाळांमध्ये शास्त्रज्ञांना स्वतंत्रपणे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या विशेष सूटची आवश्यकता असते. येथे काम करणारे सर्वचजण अत्यंत खबरदारी घेतात. मात्र, एक छोटीशी चूक देखील जगाला धोकादायक ठरू शकते.