वाss भावा वाsss!! एअरपोर्टवर सिक्युरिटीने गुलाबजामचा डब्बा अडवला; त्यानंतर हिमांशू ने केलं असं काही

एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकिंग हे रुटीन असतं. अनेकदा पॅसेंजर्स आपल्या बागेत अशा गोष्टी आणतात ज्यांना विमानात नेण्याची परमिशन नसते. अशीच एक घटना घडलीये एका विमानतळावर ( Airport Gulab Jamun Sharing) . महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना घडलीये एका भारतीय पॅसेंजरबरोबर ( Indian Passenger) .या विमानतळावर हिमांशू  नावाच्या एका प्रवाशाला विमानतळावर गुलाबजांचा डबा ( Gulab Jamun )  नेऊ दिला नाही. यानंतर हिमांशू यांनी जे केलं ते पाहून लोकं हैराण झालीत 

Updated: Oct 4, 2022, 09:15 PM IST
वाss भावा वाsss!! एअरपोर्टवर सिक्युरिटीने गुलाबजामचा डब्बा अडवला; त्यानंतर हिमांशू ने केलं असं काही  title=

Airport Trending Video: एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकिंग हे रुटीन असतं. अनेकदा पॅसेंजर्स आपल्या बागेत अशा गोष्टी आणतात ज्यांना विमानात नेण्याची परमिशन नसते. अशीच एक घटना घडलीये एका विमानतळावर ( Airport Gulab Jamun Sharing) . महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना घडलीये एका भारतीय पॅसेंजरबरोबर ( Indian Passenger) .या विमानतळावर हिमांशू  नावाच्या एका प्रवाशाला विमानतळावर गुलाबजांचा डबा ( Gulab Jamun )  नेऊ दिला नाही. यानंतर हिमांशू यांनी जे केलं ते पाहून लोकं हैराण झालीत 

डबा फेकून द्या किंवा जमा करा : 

हिमांशू देवगण नावाच्या प्रवाशाला थायलँडवरून ( Himanshu Devgan Phuket Airport) भारतात येण्यासाठी फुकेत विमानतळावर सिक्युरिटी चेक करायचं होतं. अशातच हिमांशू यांच्या बॅगेत विमानतळ कर्मचाऱ्यांना गुलाबजामचा डबा मिळाला. तुम्ही विमानात डब्बा घेऊन जाऊ शकत नाहीत असं त्यांना सांगण्यात आलं. यानंतर हिमांशू याना विमानतळ कर्मचाऱ्यांनी दोन ऑप्शन्स दिलेत. एकतर गुलाबजाम ने भरलेला डबा फेकून द्या किंवा सेक्युरिटीकडे जमा करा. मात्र हिमांशू यांनी दोघांपैकी एकही ऑप्शन सिलेक्ट केला नाही. 

हिमांशू यांनी काय केलं?

दोनच ऑप्शन समोर आल्यानंतर हिमांशू यांनी हा मिठाईचा डब्बा तिथेच उघडला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना गुलाबजाम खाऊ घातलेत. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. याव्हिडिओवर व्ह्यूज, कमेंट्स  आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. यावर 1100000 पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 61000 हजारांपेक्षा जास्त लाईक्स आलेले आहेत. इंटरनेटवर या व्हिडीओखली जे कमेंट्स आलेत त्यावर लोकांनी हिमांशू यांची प्रशंसा केली आहे.

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वतः हिमांशू यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  सोबत त्यांनी #ShareHappiness #WeAreIndians #PhuketAirport हे हॅशटॅग्स देखील वापरले आहेत.