मुंबई : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे. जेथे कोण कधी प्रसिद्ध होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर अनेक लोकांना तुम्ही रातोरात प्रसिद्धी मिळालेली पाहलं आहे. या मध्ये काही लोकांचे व्हिडीओ व्हायरल होतात, तर काहींचे डायलॉग, तर काहींचे हावभाव. या गोष्टींना बरेच लोक मीम मटेरीअल म्हणून देखील वापर करतात. उदा. 'मारो मुझे मारो' हा डायलॉग. या डायलॉगला अनेक लोक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात.
त्यांपैकी एक आहे हावभाव व्यक्त करणारी मुलगी kailia posey. तुम्ही कदाचित या मुलीला नावाने ओळखत नसाल, परंतु तिचा स्टिकर किंवा GIF तुम्ही एकदा तरी वापरलाच असणार.
परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, या लहान मुलीने आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी kailia posey ने आत्महत्या केली.
तिच्या कुटुंबीयांनी या बातमीची पुष्टी केली आहे. तसेच त्यांना या गोष्टीचा धक्का बसला असल्यामुळे आम्हा काही काळ एकटं सोडवं अशी kailia posey च्या आईने सर्वांना विनंती केली आहे.
आयुष्यात सगळं काही ठिक सुरु असताना kailia posey ने आत्महत्या का केली, यामागचं कारण कळू शकलेलं नाही. परंतु तिच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार तिचं भविष्य फार उज्वल होतं. तिलो चांगली प्रसिद्धी मिळाली होती. शिवाय तिला हायस्कूलची मेन चिअर लिडरची पोजिशन देखील मिळाली होती. त्यामुळे भविष्याव्यतिरिक्त आणखी कोणती समस्या kailia posey ला होती का, याची चौकशी पोलीस करत आहेत.