AstraZeneca च्या 19 हजारांपेक्षा जास्त लसी पेटवून दिल्या

 तुम्हाला ते ऐकून धक्का बसेल. आफ्रिकन देशात मलावी येथे कोविड -19 विरुद्ध विकसित करण्यात आलेल्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका व्हॅक्सिनचे (AstraZeneca Vaccine) 19 हजार 610 डोस बुधवारी वाया गेले.

Updated: May 20, 2021, 06:07 PM IST
AstraZeneca च्या 19 हजारांपेक्षा जास्त लसी पेटवून दिल्या title=

मलावी : कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध आहेत, तर काही देशांच्या निम्म्या लोकसंख्या इतक्या ही लस त्यांच्याकडे उपलब्ध नाही. अशात एक अशी बातमी समोर आली आहे की, तुम्हाला ते ऐकून धक्का बसेल. आफ्रिकन देशात मलावी येथे कोविड -19 विरुद्ध विकसित करण्यात आलेल्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका व्हॅक्सिनचे (AstraZeneca Vaccine) 19 हजार 610 डोस बुधवारी वाया केले गेले. ही लस काही दिवसांपूर्वी एक्सपायर झाली आहे.

अ‍ॅस्ट्रॅजेनेका व्हॅसिनला (AstraZeneca ) आफ्रिकियन युनियन (AU)  आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) या  दोघांनीही सुरक्षित घोषित केले आहे. अफ्रीका सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (आफ्रिका सीडीसी) चे संचालक जॉन नेकेंगसॉन्ग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितले की, AU आणि WHO यांच्या पुढाकाराने 26 मार्च रोजी आफ्रिका देशाला 1 लाख 2 हजार लसीं उपलब्ध करुन दिल्या.

पण त्या लसीची मुदत 13 एप्रिल ला संपली. म्हणजेच,  त्यांचा वापर करण्यासाठी आफ्रिकेकडे फक्त तीन आठवडे होते (Malawi Destroys COVID Vaccine) मलावीतून 80 टक्क्यांपेक्षा जास्त लसी वेगवेगळ्या ठिकाणी पोहचवल्या होत्या.

गेल्या महिन्याच्या शेवटी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, या लसी 13 जुलैपर्यंत वापरल्या जाऊ शकता. डब्ल्यूएचओने आफ्रिकन देशांना दान दिलेल्या या लसींना वाया घालवू नका असे आधीच सांगितले होते.

परंतु मलावी सरकारने या लसी आपल्या नागरिकांना देण्यास नकार दिला. त्यांचे असे म्हणणे आहे की, "आम्ही या लसींना सरकारच्या धोरणाखाली नष्ट करत आहोत कारण, एक्सपायर लसीचा वापर केला जाऊ शकत नाही."

सर्व लस पेटवल्या

त्यानंतर सरकारने या लसींना लाल रंगाच्या प्लॅस्टीक बॅगमध्ये ठेवून आग लावली. एसआयआयने अद्याप या प्रकरणात काहीही वक्तव्य केले नाही. यापूर्वी दक्षिण सुदानने ए.यू. कडून मिळालेल्या 59 हजार लसी बाजूला ठेवल्या होत्या आणि लस एक्सपायर झाल्यांमुळे त्यांना वापरले नाही.

मलावीचे आरोग्य मंत्रालयांचे म्हणते आहे की, देशात 18 मेपर्यंत 3 लाख 35 हजार 232 लसी देण्यात आल्या आहेत. कोरोनाचे एकूण 34 हजार 231 प्रकरणे आणि 1 हजार 153 मृत्यूची नोंद झाली आहे.

आफ्रिकन देशांना कोविड -19 च्या लस मिळणे खूप कठीण जात आहे. परंतु डब्ल्यूएचओच्या उपक्रमांतर्गत त्यांना लसीकरण केले जात आहे.