मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रो-3चे तिकिट दर किती? आरे ते बीकेसीसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे

Mumbai Metro 3: आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 4, 2024, 08:10 AM IST
मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रो-3चे तिकिट दर किती? आरे ते बीकेसीसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे title=
Mumbai Metro 3 Opens October 5 10 New Stations With Fares Starting At Rs 10

Mumbai Metro 3: बहुप्रतीक्षित कुलाबा ते आरे मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शनिवारी होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तर रविवारपासून ही मेट्रो मार्गिका नागरिकांसाठी खुली होणार आहे. कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीकडून (सीएमआरएस) ही मेट्रो मार्गिका सुरू करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. म्हणजेच मेट्रो मार्गिका सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कुलाबा ते आरे या 33.5 किमी मार्गिकेपैकी पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी असा 12.4 किमीचा मार्ग खुला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील या मार्गावर प्रत्येक 6.40 मिनिटांच्या अंतरावर गाडी चालवली जाणार आहे. 33.5 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेवर 27 स्थानके असतील. तर, पहिल्या टप्प्यात 10 स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी या प्रवासासाठी 50 रुपये तिकिट आकारले जाणार आहे. तर, या मार्गावर सर्वात कमी तिकिट 10 रुपये असणार आहे. 

आरे ते बीकेसी प्रवासासाठी मुंबईकरांना 50 रुपये मोजावे लागणार आहेत. आरे जेव्हीएलआर ते मरोळ नाक्यापर्यंतच्या अतंरासाठी प्रवाशांना 20 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. तर, आरे जेव्हीएलआर स्थानकापासून विमानतळ टी 1 टर्मिनल स्थानकापर्यंत 30 रुपयांपर्यंत भाडे आकारले जाणार आहे. वांद्रे कॉलनी स्थानकापर्यंत प्रवाशांना 40 रुपये मोजावे लागणार आहेत. 

असे असतील तिकिट दर 

सीप्झ- 10 रुपये
एमआयडीसी अंधेरी-20
मरोळ नाका-20
सीएसएमआयए टी2-30
सहार रोड- 30
सीएसएमआयए टी1-30
सांताक्रुझ-40
वांद्रे कॉलनी-40
बीकेसी-50 

मेट्रो-3 वर अशी असतील स्थानके

कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.

पहिल्या टप्प्यातील 10 स्थानके

आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतराराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, सहार रोड, विमानतळ टर्मिनल 1, सांताक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी