Ravichandran Ashwin Slams for Superstar Culture: अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन त्याच्या एका वक्तव्यामुळे खूप पुन्हा एकदा खूप चर्चत आला आहे. त्याच्या या वेळेच्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. अश्विनने भारतीय संघातील सुपरस्टार संस्कृतीवर टीका केली आहे. त्याने म्हटले आहे की, भारतीय क्रिकेटपटूंना देव मानणे बंद केले पाहिजे आणि त्यांचे पाय जमिनीवर राहण्यासाठी गोष्टी सामान्य ठेवल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७६५ विकेट घेणारा भारताचा सर्वात यशस्वी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन हे ही म्हणाला की, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांची शतके ही सामान्य शतके मानली पाहिजेत, कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आधीच खूप काही साध्य केले आहे.
रविचंद्रन अश्विनने त्याच्या हिंदी यूट्यूब चॅनल ‘ऐश की बात’ मध्ये म्हटले आहे की, ‘भारतीय क्रिकेटमध्ये गोष्टी सामान्य ठेवण्याची गरज आहे. भारतीय क्रिकेट संघातील ही सुपरस्टार संस्कृती आणि सुपर सेलिब्रिटी संस्कृतीवर मात करायला हवं. भविष्यात गोष्टी सामान्य ठेवण्याची गरज आहे. आम्ही क्रिकेटर आहोत, कोणी अभिनेता किंवा सुपरस्टार नाही. आम्ही खेळाडू आहोत आणि आम्हाला अशा प्रकारे जगायचे आहे की सामान्य माणूस आपल्याला त्याच्या जवळ घेऊन आपली तुलना करू शकेल."
हे ही वाचा: पुन्हा एकदा सचिन! 'या' लीगमध्ये तेंडुलकर होणार कर्णधार, जाणून घ्या कोणते संघ होणार सहभागी
अलीकडेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनेही संघातील सुपरस्टार संस्कृतीवर टीका केली होती . अश्विन म्हणाला, "जर तुम्ही रोहित शर्मा किंवा विराट कोहली असाल तर तुम्ही तुमच्या कारकिर्दीत खूप काही साध्य केले आहे. अशा परिस्थितीत आणखी एक शतक झळकावणं ही तुमची उपलब्धी असू शकत नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे आणि या यशांपेक्षा मोठी उद्दिष्टे असली पाहिजेत."
रविचंद्रन अश्विनने 106 कसोटी सामन्यात 537 विकेट घेतल्या आहेत आणि 3503 धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतके आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 124 आहे. अश्विनने कसोटी सामन्यात 37 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.