Zaheer Khan Sagrika Ghatge Inter Faith Wedding : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगेनं काही काळ माजी क्रिकेटपटू झहीर खानसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केलं. ते दोघं 2017 मध्ये लग्न बंधनात अडकले. दोघांनी जेव्हा लग्न केलं तेव्हा वेगवेगळ्या धर्माचे असल्यानं त्यांचं नातं हे चांगलंच चर्चेत होतं. दोघांनी कधीच यावर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं नाही. पण सध्या सागरिकानं सांगितलं की दोघं वेगवेगळ्या धर्माचे असले तरी त्यांच्या कुटुंबाला काही हरकत नव्हती.
सागरिकानं हॉटरफ्लाइला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की दोघांमध्ये कधीच धर्माला घेऊन कोणत्याही अडचणी आल्या नाही. त्यांच्या जवळपासच्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या धर्मामध्ये लग्न केलं होतं. त्याशिवाय त्या दोघांच्या कुटुंबाला या गोष्टीची कधीच अडचण नव्हती. त्याविषयी बोलताना सागरिका म्हणाली, 'आमच्या आजुबाजूचे लोक बोलत होते. माझ्या कुटुंबातील लोकांना या गोष्टीची अडचण नव्हती आणि महत्त्वाचं म्हणजे याविषयी चर्चा झाली होती. पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हेच होतं की योग्य व्यक्तीला शोधणं. ज्याच्यासोबत मी माझं आयुष्य व्यथित करू शकते.'
सागरिकानं पुढे सांगितलं की झहीर आणि तिनं कायम एकमेकांचा आदर केला आणि त्याच कारणामुळे त्यांचं नातं हे इतकं मजबूत आहे. एकदा झहीर माझ्या वडिलांना भेटला, त्या दोघांचं नातं खूप सुंदर होतं. माझ्या आईसोबत देखील त्याचं चांगलं जमतं. माझी आई तर माझ्यापेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर करते.
झहीर आणि सागरिकानं बराच काळ त्यांचं नात हे सगळ्यांपासून लपवलं. पण मग युवराज सिंगच्या लग्नाच्या दरम्यान, दोघांना एकत्र पाहून सगळ्यांना अंदाज आला. सागरिका म्हणाली, युवराज सिंगच्या लग्नात मी गेले होते आणि तेव्हा या गोष्टीचा अंदाज आला होता की आता सगळ्यांना कळणार. त्यामुळे मी सगळ्यात आधी हे वडिलांना सांगितलं. मला वाटलं ते 10 मिनिटं भेटतील, पण ते तासं तास बोलत राहिले.
हेही वाचा : 'त्यांना माफ करायला हवं!' रणवीर अलाहबादियाच्या समर्थनात उतरले प्रसिद्ध गीतकार
दरम्यान, सगळं तेव्हा बदललं जेव्हा सागरिकाच्या वडिलांनी लगेच झहीरचे माजी कोच यांना फोन केला जे सागरिकाचे काकाच होते. त्यानंतर तिच्या काकांनी झहीरला विचारलं त्याचं सागरिकाशी काय नातं आहे? पण झहीरला तितक्यात कळलं की आता या प्रश्नावर कशी प्रतिक्रिया द्यायची. त्यानं सागरिकाला मेसेज दाखवला आणि काकांना रिप्लाय दिला नाही. तर यात सागरिकानं देखील झहीरला पाठिंबा दिला.