Nagpur Goa Shaktipeeth Expressway : नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची घोषणा सरकारने केली आहे. मात्र, या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. अनेक शेतकरी संघटना हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाधी रस्त्यावर उतरल्या आहेत. शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 23 मार्च शहीद दिनी शेतकरी सामुदायिक फासावर लटकतील किंवा शेतात येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवू अशा इशारा दिला आहे.
नागपूर गोवा-शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा येत्या 23 मार्च शहीद दिनी शेतकरी सामुदायिक फासावर लटकतील असा टोकाचा निर्णय महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेत जमिन अधिग्रहणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवूअसा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. सांगलीमध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या महामार्ग लढा प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे.
शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकार ब्रिटिशांप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक देत आहे. राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांना जसं फासावर लटकवलं तशीच अवस्था आज शेतकऱ्यांची करण्यात येत आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास शेतकरी 23 मार्च शहीद दिनी शेतामध्ये सामुदायिक आत्महत्या करतील किंवा जमीन घेण्यासाठी येणाऱ्या अधीकारऱ्यांना फासावर लटकवतील,असा असा इशारा देण्यात आला आहे.
सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढ्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली यावेळी शेतकरयांनी हा निर्धार केल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या महामार्ग आघाडीचे राज्याध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी हा इशारा दिला आहे.
जवळपास 800 किलोमीटरचा हा प्रस्तावित सुपरफास्ट हायवे आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा 11 तासांत गाठता येणार आहे.हा महामार्ग 12 जिल्ह्यातील देवस्थानांना जोडणार आहे. म्हणूनच या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग नाव देण्यात आले आहे. हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रसह कोकणाला जोडणारा आहे. हा महामार्ग 13 जिल्ह्यांतून जाणार आहे.