एलॉन मस्कला माझ्यापासून 13 वं मूल; अमेरिकन मॉडेलच्या दाव्यानंतर एकच खळबळ, म्हणाली 'माझ्या मुलाची सुरक्षा....'

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासह इलॉन मस्कही चर्चेत आले आहेत. यादरम्यान एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने इलॉन मस्क आपल्या मुलीचा बाप असल्याचा खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 15, 2025, 05:04 PM IST
एलॉन मस्कला माझ्यापासून 13 वं मूल; अमेरिकन मॉडेलच्या दाव्यानंतर एकच खळबळ, म्हणाली 'माझ्या मुलाची सुरक्षा....' title=

टेस्ला कंपनीचा मालक इलॉन मस्क आपल्या मुलीचा बाप असल्याचा खुलासा अमेरिकेतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि लेखिका अ‍ॅशले क्लेअरने केला आहे. 26 वर्षीय क्लेअरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा दावा केला आहे. पाच महिन्यांपूर्वी आपण गुप्त पद्धतीने बाळाला जन्म दिला होता. मात्र त्याची सुरक्षा आणि गोपनीयतेमुळे ते जाहीर केलं नव्हतं असं तिने सांगितलं आहे. जर क्लेअरचा दावा खरा असेल तर हे इलॉन मस्कर यांचं 13 वं मूल असेल. मस्कला 2 बायका आणि 3 प्रेयसींपासून 12 मुलं आहेत. 

क्लेअरने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "5 महिन्यांपूर्वी मी बाळाचं या जगात स्वागत केलं. मस्क त्याचा वडील आहे. मी बाळाची सुरक्षा आणि गोपनियता या कारणांमुळे हे उघड केलं नव्हतं. पण गेल्या दिवसात मीडिया यामुळे कोणती हानी होऊ शकते याची चिंता न करता उघड करण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मला माझ्या बाळाला साध्या आणि सुरक्षित वातावरणात वाढवायचं आहे. यामुळे मी मीडियाला बाळाच्या गोपनीयतेचा आदर करुन, घुसखोरी होईल अशी रिपोर्टिंग बंद करण्याची विनंती करते".

क्लेअरचे एक्सवर 10 लाख फॉलोअर्स

२६ वर्षीय अ‍ॅशले सेंट क्लेअर ही एक इन्फ्लुएन्सर आणि लेखिका आहे. तिने "एलिफंट्स ऑर नॉट बर्ड्स" नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्कमधील सर्वात महागड्या भागात असलेल्या मॅनहॅटनमध्ये राहणारी अ‍ॅशले रूढीवादी विचारांना पाठिंबा देते. तिचे एक्सवर 10 लाख फॉलोअर्स आहेत.

डेली मेलच्या वृत्तानुसार, अॅशले मॅनहॅटनमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. या अपार्टमेंटचं मासिक भाडं 12 ते 15 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 13 लाख रुपये आहे. टेस्ला सायबर ट्रक असलेल्या पहिल्या लोकांपैकी अ‍ॅशले एक होती अशी माहिती तेथील रहिवाशांनी दिली आहे. 

मस्क गेल्यावर्षी झाले 12 मुलांचे वडील

इलॉन मस्कने या दाव्यावर अद्यापपर्यंत काही भाष्य केलेलं नाही. मस्क सध्या न्यूरालिंकची व्यवस्थापक शिवोन जिलिस्ले हिच्यासह नात्यात आहे. दोघांनाही तीन मुलं आहेत. गेल्या वर्षीच मस्कर १२ व्या मुलाचा बाप झाला.

मस्कने 2000 मध्ये कॅनेडियन लेखिका जस्टिन विल्सनशी पहिलं लग्न केलं होतं. त्यांचा पहिला मुलगा नेवाडाचा जन्म 2002 मध्ये झाला होता. पण तो दहा आठवड्यांचा असताना इंफेंट डेथ सिंड्रममुळे मरण पावला. 2008 मध्ये त्याने विल्सनशी घटस्फोट घेतला.

'जगात कमी लोकसंख्येचे संकट'

मस्करने 2010 मध्ये ब्रिटिश स्टार तल्लुलाह रिलेशी लग्न केले. तथापि, 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्याने पुन्हा लग्न केलं. तल्लुलाहने डिसेंबर 2014 मध्ये दुसऱ्यांदा घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, परंतु पुढच्या वर्षी तो मागे घेतला. मार्च 2016 मध्ये, तल्लुलाहने तिसऱ्यांदा घटस्फोटासाठी अर्ज केला आणि घटस्फोट घेतला. त्यांना कोणतंही मूल नाही. 

जग सध्या लोकसंख्या संकटाचा सामना करत आहे आणि चांगले बुद्ध्यांक असलेल्या लोकांना मुलं जन्माला घातली पाहिजेत असं मस्कने म्हटलं होतं. 2021 मध्ये त्याने म्हटलं होतं की जर लोकांनी जास्त मुलं जन्माला घातली नाहीत तर आपली संस्कृती संपेल.