स्लॅप ते ब्रेकअप डे: आजपासून अँटी-व्हॅलेंटाइन आठवड्याला सुरूवात; नेमका कसा साजरा करतात?

प्रेमावर विश्वास न ठेवणाऱ्या तसेच ब्रेकअप झालेल्या व्यक्तींसाठी अँटी-व्हॅलेंटाइनचा आठवडा खास असतो. सिंगल असणारेदेखील हा आठवडा साजरा करु शकतात. जाणून घेऊयात, अँटी-व्हॅलेंटाइन आठवड्यातील दिवसांचे महत्त्व.  

Updated: Feb 15, 2025, 04:34 PM IST
स्लॅप ते ब्रेकअप डे: आजपासून अँटी-व्हॅलेंटाइन आठवड्याला सुरूवात; नेमका कसा साजरा करतात? title=

Anti Valentine Week 2025: प्रेमी युगूलांसाठी व्हॅलेंटाइनचा आठवडा हा खूपच खास असतो. 14 फ्रेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करतात तसेच एकमेकांना भेटवस्तू देत आपल्या भावना व्यक्त करतात. या दिवशी मॉल आणि बाजारांमध्येसुद्धा प्रेमाचे प्रतीक असलेल्या बऱ्याच भेटवस्तू पाहायला मिळतात. मात्र, फ्रेब्रुवारी हा महिना फक्त प्रेमात पडणाऱ्यांसाठीच नव्हे तर सिंगल आणि ब्रेकअप झालेल्यांसाठीसुद्धा तितकाच खास असतो. अ‍अँटी-व्हॅलेंटाइन हाच तो आठवडा. हा प्रेमावर विश्वास न ठेवणाऱ्या तसेच ब्रेकअप झालेल्या व्यक्तींसाठी खास असतो. जाणून घेऊयात, अँटी-व्हॅलेंटाइन आठवड्यातील दिवसांचे महत्त्व.

अँटी-व्हॅलेंटाइन आठवड्यातील दिवस:-

15 फेब्रुवारी – स्लॅप डे (Slap Day)
16 फेब्रुवारी – किक डे (Kick Day)
17 फेब्रुवारी – परफ्यूम डे (Perfume Day)
18 फेब्रुवारी – फ्लर्ट डे (Flirt Day)
19 फेब्रुवारी – कन्फेशन डे (Confession Day)
20 फेब्रुवारी – मिसिंग डे (Missing Day)
21 फेब्रुवारी – ब्रेकअप डे (Breakup Day)

15 फेब्रुवारी – स्लॅप डे (Slap Day)

जर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीने धोका दिलेला असेल किंवा नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर या दिवशी तुम्हाला तुमचा राग व्यक्त करु शकता. या दिवशी तुम्हाला धोका देणाऱ्या व्यक्तीबद्दल राग व्यक्त करत कानाखाली मारु शकता. असे केल्याने तुमच्या मनातील कटूता दूर होते. 

16 फेब्रुवारी – किक डे (Kick Day)

या दिवशी तुम्ही तुमच्या सर्व वाईट आठवणींना दूर करु शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनातील वाईट लोक आणि वाईट आठवणी मागे टाकून पुढे चालण्याचा प्रयत्न करु शकता. 

17 फेब्रुवारी – परफ्यूम डे (Perfume Day)

जीवनातील सगळ्या वाईट आठवणी आणि वाईट लोकांना मागे टाकल्यानंतर दिवस येतो तो स्वत: ला आनंदी करण्याचा. या दिवशी स्वत: ला उत्साही वाटण्यासाठी परफ्यूमचा वापर करु शकता. परफ्यूमच्या सुगंधाने आनंदी होऊन या दिवशी तुम्ही स्वत: ला आनंदी ठेवण्याचे वचन देऊ शकता. 

18 फेब्रुवारी – फ्लर्ट डे (Flirt Day)

प्रेमात धोका मिळाल्यानंतर घडलेल्या सर्व गोष्टी मागे सारुन तुम्ही लोकांशी हेल्दी फ्लर्ट करु शकता. यामुळे छान वाटेल. याच्या मदतीने तुम्ही भूतकाळातील आठवणींचा विचार न करता वर्तमान जीवनाचा आनंद घेऊ शकता.

19 फेब्रुवारी – कन्फेशन डे (Confession Day)

'कन्फेशन डे' म्हणजे असा दिवस ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट इतरांना किंवा जवळच्या व्यक्तींना सांगता. या दिवशी, ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या जवळचे आणि खास मानता, त्या व्यक्तीजवळ तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. तसेच, या दिवशी तुम्ही कोणाशी चुकीचे किंवा वाईट वागले असाल तर त्यांची माफी देखील मागू शकता.

20 फेब्रुवारी – मिसिंग डे (Missing Day)

मिसिंग डेला ज्यांना तुम्ही खूप दिवस भेटला नाहीत किंवा ज्यांच्याशी बोलला नाहीत अशा व्यक्तींची आठवण काढू शकता. यामध्ये तुमचे प्रेम किंवा मित्र आणि कुटुंबातील सदस्य यांचा सहभाग असू शकतो. या दिवशी तुम्ही तुमच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करू शकता.

21 फेब्रुवारी – ब्रेकअप डे (Breakup Day)

आता येतो अँटी-व्हॅलेंटाइनचा शेवटच्या दिवशी ब्रेकअप डे. जर तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजेच नावडत्या व्यक्तीसोबत नातेसंबंधात असाल तर तुम्ही या दिवशी ते नाते संपवू शकता. त्या व्यक्तीबद्दलच्या जुन्या वाईट आठवणी मागे टाकून पुढे जाण्याचा हा दिवस आहे.