Crime News Today: बिहारच्या मुजफ्फरपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक महिला लग्नाच्या 10 महिन्यानंतरच तिच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. महिलेचा पती बाहेरगावी नोकरीसाठी राहतो. 24 एप्रिल रोजी तरुणाचं लग्न झालं होतं. मात्र, लग्नाला एक वर्ष होण्याआधीच पत्नी पळून गेली आहे.
पती बाहेरगावी नोकरीसाठी असताना त्याने तिथून पत्नीसाठी फोन खरेदी केला होता. त्याने तो फोन पत्नीला गिफ्ट म्हणून दिला होता. मात्र या फोनवरुन ती प्रियकरासोबत गप्पा मारायची. तर व्हॅलेंटाइन वीकमध्ये ती घरातून कॅश आणि दागिने घेऊन फरार झाली होती. साहेबागंज क्षेत्रातील रामपूर असली गावातील हे प्रकरण आहे.
10 फेब्रुवारी रोजी रात्री महिलेने तिच्या सासू-सासऱ्यांना जेवायला वाढले आणि त्यांच्या झोपण्याची वाट पाहू लागली. त्यानंतर ती घरात ठेवलेले दागिने आणि पैसे घेऊन प्रियकरासोबत बाइकवर बसून फरार झाली. सासू-सासऱ्यांना रात्री बाइकचा आवाज आल्यावर जाग आली. मात्र त्यांना नेमकं काय घडलं हे लक्षात आलं नाही. जेव्हा सकाळी सून घरात कुठेच दिसली नाही तेव्हा ते थक्कच झाले. त्यानंतर त्यांनी मुलाला फोन करुन याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली.
महिलेच्या पतीने म्हटलं होतं की पत्नीचे लग्नाच्या आधीच अफेअर होते. जेव्हा पतीला याबाबत कळलं तेव्हा त्याचे पत्नीसोबत वाद झाले. तो बंगळुरमध्ये मजुरीचे काम करायचा तर त्याचा संपूर्ण पगारदेखील पत्नीच्या बँक खात्यात पाठवायचा. त्यानंतरच त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. पतीने म्हटलं आहे की, ती त्याने तिचा विश्वासघात केला आहे. आता ती पुन्हा आली तरी मी तिच्यासोबत नांदणार नाही.