'त्यांना माफ करायला हवं!' रणवीर अलाहबादियाच्या समर्थनात उतरले प्रसिद्ध गीतकार

Swanand Kirkire On India's Got Latent : स्वानंद किरकिरे यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 15, 2025, 05:50 PM IST
'त्यांना माफ करायला हवं!' रणवीर अलाहबादियाच्या समर्थनात उतरले प्रसिद्ध गीतकार title=
(Photo Credit : Social Media)

Swanand Kirkire On India's Got Latent : महाकुंभ मेळ्यानिमित्तानं सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच प्रयागराजमध्ये आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातून सगळे तिथे उपस्थित राहत आहेत. त्यानिमित्तानं एका मुलाखतीत लोकप्रिय अभिनेता, गायक, कवी आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांनी एक असं वक्तव्य केलं ज्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं. महत्त्वाचं म्हणजे स्वानंद किरकिरे यांनी यावेळी 'इंडियाज गॉट लेटेंट' कॉन्ट्रोव्हर्जीवर वक्तव्य केलं आहे. 

स्वानंद किरकिरे यांनी 'साहित्य आजतक' च्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला विचारण्यात आलं की स्वत: ला कवी म्हणून कसा पाहतोस? त्यावर उत्तर देत स्वानंद म्हणाले, 'मी कधीच स्वत: ला कधी कवी समजलं नाही. मी थिएटरमधून आलेल्या लोकांपैकी एक आहे. मी चित्रपटांमध्ये आलो आणि चित्रपटांसाठी मी गाणी लिहिण्यास सुरुवात केली. चित्रपटाला कशा प्रकारचं गाणं हवं, ते कळलं की मी लिहीतो. जर मी चित्रपटांसाठी गाणी लिहितो, तर दरवेळी गाण्याची भाषा बदलते. काही प्रमाणात चरित्रांच्या हिशोबानं किंवा वेळेनुसार गोष्ट बदलतात.' 

पुढे रणवीर अलाहबादियानं जे वक्तव्य केलं त्यावर प्रतिक्रिया विचारता स्वानंद किरकिरे म्हणाले, 'जे झालं ते व्हायला नको होतं. कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते आणि ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खरंतर, झालं असं की कॅमेरा आपल्या आयुष्यात आला आणि आपल्याला कळलंच नाही की मित्रांमध्ये करणाऱ्या गोष्टी आणि सगळ्यांसमोर करणाऱ्या गोष्टी, दोघांमध्ये एक फरक आहे. ते कॅमेऱ्यासमोर काही झालं आणि ते शेअर करण्यात आलं. लोकं हसले. तुम्हाला वाटलं की आपण असंच करु. पण काही गोष्टी या प्रायव्हेटमध्ये करण्यात येतात. अशा प्रकारत्या काही गोष्टी तर आपण प्रायव्हेटमध्ये देखील करायला नको. काही गोष्टी अशा असतात ज्या कधीच बाहेर यायला नको पाहिजे. पण मला यावर हेच वाटतं की त्यांना माफ करायला हवं. कारण त्यांनी आधीच माफी मागितली आहे. देशात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या म्हटल्या गेल्या आहेत ज्या कधी बोलायला नको होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या होत्या. त्यांनी चुकीच केलं. आपल्या देशाला त्यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिलीये. त्या लोकांना माफी देखील मागितली आहे. आता या गोष्टीला इथेच थांबवायला हवं. ते चॅनलपण देलं. मी त्यांना कधी पाठिंबा पण दिला नाही.'

हेही वाचा : 'त्या लोकांनी...' प्रतीक बब्बरने लग्नात कुटुंबियांना का बोलावलं नाही? बहिणीनं सांगितलं खरं कारण

पुढे स्वानंद किरकिरे म्हणाले, 'मी याच्या 6 महिन्या आधी देखील सांगितलं होतं की कॉमेडीचा अर्थ फक्त रोस्ट करणं होत नाही. त्याशिवाय कोणाची खिल्ली उडवणं ही देखील कॉमेडी नाही. लोकप्रियता मिळवण्यासाठी कोणी रोस्ट करतंय आणि त्यामुळे मी लोकप्रियता मिळवेल असं वाटतं. त्यामुळे मी तिथे रोस्ट करण्यासाठी पोहोचलो. त्याचा अर्थ हा नाही की दोन्ही बरोबर आहेत. पुढे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि माफ करायला हवं. कायद्यांद्वारे कोणतेही नियंत्रण नसावे. म्हणून, कंटेंट निर्मात्याने त्याचे काम जबाबदारीने केले पाहिजे.'