पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील सामन्यासह चॅम्पिअन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. मात्र यावेळी सर्वाधिक उत्सुकता आणि चर्चा भारत-पाकिस्तान सामन्याची आहे. 23 फेब्रुवारीला दुबईत हा सामना खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान पारंपारिक प्रतिस्पर्धी असल्याने दोन्ही संघातील सामने नेहमीच चर्चेचा विषय असतात. पण यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला असल्याने हा सामना अधिक रंजक होणार आहे.
खरं चर संपूर्ण चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणं अपेक्षित होतं. पण बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याची भूमिका घेतली. यानंतर फार चर्चा केल्यानंर हायब्रीड पद्धतीने स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.
भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तानमधील चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचं कारण या सर्वांना आपल्या देशात भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळेल अशी आशा होती. पाकिस्तानी पत्रकार फरीद खान यांनी पाकिस्तानी चाहते खूप नाराजा असल्याचं म्हटलं आहे. त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेट चाहता मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाला चॅम्पिअन्स ट्रॉफी संपेपर्यंत भारतीय खेळाडूसोबतची मैत्री बाजूला ठेवा असं सांगितलं आहे. तसंच त्याने पाकिस्तानी खेळाडूंना विराट कोहली किंवा भारतीय खेळाडूंना मिठी मारु नका असंही सांगितलं आहे.
PAKISTAN FANS ANGRY WITH VIRAT KOHLI & ROHIT SHARMA
Fans believe Pakistan players should not hug Indian players during the match. Team India betrayed Pakistan by not coming here. Do you agree? #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/Grw73YYYzJ
— Farid Khan (@_FaridKhan) February 3, 2025
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक किंवा पुरुष टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा पाकिस्तानविरोधातील रेकॉर्ड चांगला आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानची 3-2 अशी आघाडी आहे.
2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सरफराज अहमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने विराट कोहलीच्या भारताला हरवून देशाच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध विजयांपैकी एक मिळवला. भारताने ग्रुप स्टेजमधअये पाकिस्तानला हरवले होते आणि कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ विजेतेपदही जिंकेल अशी अपेक्षा होती. परंतु पाकिस्तानने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केलं.