Chhaava fame Actor : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षीत 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटातील सर्व पात्रांचं प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. चित्रपटात असं एक पात्र आहे ज्याने सर्वांना आकर्षित केलं आहे. ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असणाऱ्या अभिनेत्याचं पात्र.
आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्या अभिनेत्याने डॉक्टर पदवी सोडून अभिनय क्षेत्र निवडले. हा अभिनेता इंडस्ट्रीमध्ये गेल्या 20 वर्षांपासून आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, अभिनेत्याला इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण करता आली नाही. अशातच आता अभिनेत्याने विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात भूमिका साकारून आपलं नशीब बदललं आहे.
कोण आहे हा अभिनेता?
'गँग्स ऑफ वासेपूर' आणि 'मुक्काबाज' फेम अभिनेता विनीत कुमार सिंग यांनी 'छावा' चित्रपटात कवी कलशच्या उत्कृष्ट अभिनयाने एक वेगळी छाप पाडली आहे. या चित्रपटात अभिनेत्याने कवी कलशची भूमिका साकारली आहे. तो चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या अगदी जवळच्या मित्राची भूमिका केली आहे. ज्यामध्ये ते कोणत्याही परिस्थितीत मराठा साम्राज्य आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी एकनिष्ठ राहत असतो. कवी कलश हे उत्तर भारतीय आहेत.
त्यांचा 'छावा' चित्रपटातील अभिनय खूपच प्रभावी आहे. जेव्हा ते कविता वाचतात तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सौम्यता आणि हास्य दिसून येतं. मात्र, ते कविता वाचताना त्यांच्या आवाजात गर्जना असते आणि त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक प्रचंड संताप दिसून येत असल्याचं दिसून येत आहे. ज्यामध्ये या अभिनयाने कवी कलशच्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे जीवंतपणा आणल्याचं दिसून येतं. विनीत कुमार सिंग यांची ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीमधील एक महत्त्वाची भूमिका ठरू शकते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर विनीत कुमार यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं असून त्यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून आयुर्वेदात एमडी पदवी घेतली आहे.