Katrina Kaif and Vicky Kaushal's Family on Chhaava Movie : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट काल व्हॅलेन्टाइन डे च्या निमित्तानं प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलनं खूप अप्रतिम अभिनय केला आहे. त्याच्या या चित्रपटातील अभिनय पाहिल्यानंतर पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफ आणि आई, वडील आणि भावानं स्तुती केली आहे. त्याचे काही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
कतरिनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं 'छावा'चा पोस्टर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत कतरिनानं कॅप्शन दिलं आहे की 'छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरव इतिहास जिवंत करण्यासाठी ज्या पद्धतीनं सिनेमॅटिक आणि अप्रतिम काम केलं आहे. खरंतर लक्ष्मण उतेकरांनी ही अविश्वसनीय कथा अत्यंत उत्तम पद्धतीनं सगळ्यांना सांगितली आहे. मला खूप आश्चर्य झालं. त्यातही चित्रपटाचे शेवटचे 40 मिनिटे तुम्हाला थक्क करतील. मी संपूर्ण सकाळ कधी होईल या प्रतीक्षेतच होते. जेणेकरून मला पुन्हा एकदा हा चित्रपट पाहता येईल. मी जे काही पाहिलं ते मांडण्यासाठी माझ्याकडे शब्द अपूर्ण आहेत. विकी तू अप्रतिम काम केलं आहे. जेव्हा केव्हा तू स्क्रिनवर येतोस, प्रत्येक शॉट, त्यासोबत स्क्रिनवर येणारी तुझी इन्टेन्सीटी एका सरड्यासारखा तू तुझ्या भूमिकांप्रमानं तुझं रुप बदलतोस. ते ही एगदी सहज आणि मला तुझा आणि तुझ्या प्रतिभेचा खूप अभिमान आहे.'
पुढे कतरिना संपूर्ण टीमविषयी म्हणाली, 'सगळ्याच कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे…. हा चित्रपट मोठ्या पडद्यासाठीच आहे…तर संपूर्ण टीमचा मला खूप अभिमान आहे.'
Vicky's mom is soo proud of him #VickyKaushal #Chhaava pic.twitter.com/38J4GstkJZ
— (@vickyloml February 14, 2025
हेही वाचा : 'छावा'नं पहिल्या दिवशी कमवले 33,00,00,000 ; विकी कौशलच्या शिरपेचात मानाचा तुरा
'छावा' पाहिल्यानंतर विकीचे आई-वडील आणि भाऊ यांना काय वाटलं त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत सुरुवातीला विकीचा भाऊ सनी कौशल हा मिठी मारताना दिसतो. विकीचा चित्रपट पाहिल्यानंतर सनीला किती आनंद झाला आहे आणि त्याला त्याच्या भावावर किती गर्व आहे ते दिसून येत आहे. तर विकीचे आई वडील यांना शब्द अपुरे पडत असून ते मुलाच्या अप्रतिम कामावर आनंदी झाल्याचे दिसून येत आहे.