लक्ष द्या! 1 एप्रिलपासून बदलणार पेन्शनसंदर्भातील महत्त्वाचा नियम; कोणाचा होणार फायदा?

Unified Pension Scheme : केंद्र सरकारनं सातत्यानं नागरिकांच्या वर्तमान आणि भविष्याला महत्त्व देत काही नियम आखले. सामान्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पेन्शनसंदर्भातही केंद्रानं असाच निर्णय घेतला.   

सायली पाटील | Updated: Feb 15, 2025, 12:37 PM IST
लक्ष द्या! 1 एप्रिलपासून बदलणार पेन्शनसंदर्भातील महत्त्वाचा नियम; कोणाचा होणार फायदा? title=
Modi Govt Unified Pension Scheme UPS From 1st April check Benefits and eligibility

Pension Scheme Latest Update : देशाचा सर्वांगीण विकास करत असताना देशातील कष्टकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवत मोदी सरकार सध्या विविध योजना राबवताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS). केंद्र शासनानं राष्ट्रीय पेंशन सिस्टीम (NPS) ला पर्याय म्हणून ही योजना तयार केली असून, 24 जानेवारी रोजी तिची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. 

आधीपासूनच एनपीएसअंतर्गत नोंद असणाऱ्या फक्त आणि फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) लागू असेल. 1 एप्रिल 2025 पासून ही योजना लागू होणार असून सरकारी कर्मचाऱ्यांकडे NPS किंवा UPS या दोनपैकी एका योजनेचा पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य असेल. 

अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार एनपीएसअंतर्गत सदर योजनेस पात्र सरकारी कर्मचाऱ्यांकडे एनपीएसअंतर्गत युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये सहभागी होण्याचा पर्याय असेल. जुन्या पेन्शन योजनेची मागणी सातत्यानं होत असतानाच केंद्रानं ही नवी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. जुन्या पेन्शन योजनेचं गणित पाहिलं असता या योजनेमध्ये निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनातील 50 टक्के भाग पेन्शन स्वरुपात दिला जात असे. 

UPS चा कोणाला होणार फायदा? 

युपीएस अर्थात युनायटेड पेन्शन स्कीमअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एक निश्चित पेन्शन दिलं जाणार असून, मागील 12 महिन्यांच्या सरासरी वेतनाचा 50 टक्के भाग इथं दिला जाणार आहे. या पेन्शनसाठी पात्र ठरु पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किमान 25 वर्षे सेवा देणं अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढावल्यास त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना एक निश्चित पेन्शन दिली जाईल. ही पेन्शन त्या कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पेन्शनचा 60 ट्कके भाग असेल. या योजनेअंतर्गत मिनिमम अश्योर्ड पेन्शनही दिली जाणार असून, जी व्यक्ती 10 वर्षांपप्यंत सरकारी अख्तयारित काम करते त्यांना किमान 10 हजार रुपये पेन्शनची योजना लागू असेल. 

हेसुद्धा वाचा : खात्यातून पैसे काढण्यास मनाई? आणखी दोन बँकांवरील RBI च्या कारवाईनंतर अनेकांना धास्ती 

 

ही योजना यासाठी महत्त्वाची ठरत आहे, की यामध्ये इंडेक्सेशनचा विचार करण्यात आला असून, महागाईच्या हिशोबानं निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे. म्हणजेच पेन्शनमध्ये महागाई भत्ताही वेळोवेळी जोडला जाईल. साधारण 23 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. जिथं ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईज इंडेक्स फॉर इंडस्ट्रीअल वर्कर्सच्या आधारे ही आकडेवारी करण्यात येणार असून, निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एकहाती रक्कमही दिली जाईल.