Chhaava Box Office Collection Day 1 : 'छावा'नं पहिल्या दिवशी कमवले 33,00,00,000 ; विकी कौशलच्या शिरपेचात मानाचा तुरा

Chhaava Box Office Collection Day 1 : 'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई...

दिक्षा पाटील | Updated: Feb 15, 2025, 01:58 PM IST
Chhaava Box Office Collection Day 1 : 'छावा'नं पहिल्या दिवशी कमवले 33,00,00,000 ; विकी कौशलच्या शिरपेचात मानाचा तुरा title=
(Photo Credit : Social Media)

Chhaava Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेत्री विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' हा चित्रपट काल 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडत कमाई केली आहे. अपेक्षे पेक्षा या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी शुक्रवारी 30 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली. या आधी हा विकी कौशलच्या बॅड न्यूज या चित्रपटानं रेकॉर्ड करत (8 कोटी 62 लाख) आणि उरी (8 कोटी 20 लाख) चं  नाव होतं. त्यामुळे आता 'छावा'नं किती कलेक्शन केलं हे जाणून घेऊया... 

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट यंदाच्या वर्षीचा सगळ्यात मोठा ओपनर असणार आहे. या आधी हा रेकॉर्ड अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चा होता. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 15 कोटी 30 लाख रुपयांची कमाई केली होती. पण छावानं या रेकॉर्डच्या दुप्पट कमाई केली आहे. कमाईचा आकडा हा 33.1 कोटींपेक्षा जास्त आहे. कमाईचा आकडा आणि क्रिटिक्सच्या रिव्ह्यूला पाहता हे तर स्पष्ट झालं की चित्रपट हा पहिल्याच आठवड्यात तो 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार आहे. क्रिटिक्स आणि प्रेक्षक दोघंही चित्रपटाची स्तुती करत आहेत. 
 

Chhaava Box Office Collection Day 1 breaks many record

व्हॅलेन्टाइन वीकमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट टॉपला आहे. या आधी व्हॅलेन्टाइन वीकमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या चित्रपटानं कमाई केली असेल तर तो 'गली बॉय' आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी अर्थात ओपनिंग डेला 19 कोटी 40 लाख रुपयांची कमाई केली होती. विकी कौशलच्या या चित्रपटानं जवळपास 60% मार्जिननं जास्त कमाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण आता असं दिसून येतंय की प्रेक्षकांनी या चित्रपटाला आपलं केलं आहे. 

हेही वाचा : प्रतीक बब्बरने वडील राज बब्बर यांना दिलं नाही लग्नाचं निमंत्रण; सावत्र भाऊ आर्या बब्बर म्हणाला 'तो...'

सैकनिल्कच्या माहितीनुसार, विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा चित्रपट छावानं भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जवळपास 33.1 कोटींचा गल्ला केला. तर अनेक रिपोर्ट्सनुसार, छावानं पहिल्या दिवशी 32 ते 34 कोटींचं कलेक्शन केलं. निर्मात्यांनी अजून चित्रपटानं किती कमाई केली याविषयी काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही.