Goa Crime News: गुलाबी थंडी ओसरुन उन्हाच्या झळा वाढू लागल्या होत्या. समुद्र किनारी पर्यटकांचा लोंढादेखील वाढत चालला होता. होळीची सुट्टी साजरी करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गोव्याला आले होते. संपूर्ण देशात होळीचा उत्साह असताना भारताला हादरवणारी एक घटना घडली आहे. जवळपास 8 वर्षांपूर्वी गोव्यात एका तरुणीसोबत घडलेल्या भयंकर घटनेने सर्वांचीच झोप उडवली होती. गोव्यात एका ब्रिटिश तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती.
13 मार्च 2017 रोजी ही घटना घडली होती. आठ वर्षांपूर्वी आयरलँड येथे राहणारी डॅनिएल मॅकलॉक्लिन ही तरुणी भारतात आली होती. मात्र इथून ती पुन्हा तिच्या मायभूमीत परत जाऊच शकली नाही. एका नराधमाने तिचं आयुष्यच तिच्यापासून हिरावून घेतलं होती. आता 8 वर्षांनंतर या प्रकरणात कोर्ट निर्णय देणार आहे. त्यापूर्वी जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण?
25 वर्षांची डॅनिएल मॅकलॉक्लिन मुळ आयरलँडची रहिवाशी होती. तिच्याकडे ब्रिटेन आणि आयरलँड या दोन्ही देशांचे नागरिकत्व होते. 2017मध्ये फ्रेबुवारी महिन्यात ती तिच्या एका मित्रासह गोवा फिरण्यासाठी आली होती. 13 मार्च रोजी ती गोव्यातील पालोलिम बीचजवळील एका गावात होळी पार्टीसाठी गेली होती. मात्र या पार्टीतून परतण्यासाठी तील उशीर झाला. त्यामुळं ती एकटीच हॉटेलकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिच्यासोबत भयंकर घटना घडली आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
14 मार्च 2017 रोजी डॅनिएल मॅकलॉक्लिनचा मृतदेह कानाकोनाच्या देवबाग समुद्रकिनाऱ्यालगत सापडला. तिच्या मृतदेहावर एकही कपडा नव्हता मात्र तिचा चेहरा विद्रुप करण्यात आला होता. परदेशी नागरिकाची हत्या करण्यात आल्याच्या या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली होती.
गोवा पोलिस घटनास्थळी पोहोचली होती. त्यानंतर त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. त्यात पीडित तरुणीचा मृत्यू गळ्यावर दबाव पडल्याने आणि ब्रेन हॅमरेजमुळं झाल्याचे स्पष्ट होत होते. तसंच, हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. डॅनियलच्या मृत्यूचा तपास करताना पोलिसांसमोर एक नाव आले आणि संपूर्ण तपास त्यादिशेने फिरवण्यात आला.
पोलिसांना चौकशीदरम्यान विकट भगत या मुलाचे नाव समोर आले. विकट भगत याच्यासोबत डॅनिअलची मैत्री झाली होती. तो गोव्यात अनेक ठिकाणी तिच्यासोबत फिरत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विकट भगत हा गोव्यातील सराईत गुन्हेगार होता. मात्र डॅनियलला त्याच्याबाबत फारशी माहिती नव्हती आणि तिच तिची खूप मोठी चुक ठरली.
पोलिसांनी घटनास्थळापासून जवळपास तीन किमी दूर पालोलिम बीचजवळ डॅनिअल आणि आरोपी विकट भगत यांचा एक सीसीटीव्ही फुटेज सापडलं होतं. त्यात दोघं फिरताना दिसत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री साधारण साडे नऊच्या सुमारास सीसीटीव्हीत कैद झाले होते.
पोलिसांनी विकट भगतला ताब्यात घेतलं होतं. तसंच, त्याच्या घरातून रक्ताने माखलेले कपडे आणि स्कुटी ताब्यात घेतली. स्कुटीवर रक्ताचे डागदेखील होते. चौकशीत विकीने गुन्हा कबुलदेखील केला होता. 13 आणि 14 मार्चच्या रात्री सुनसान जागी डॅनिएल मॅकलॉक्लिनला एकटं पाहून तिच्यावर जबरदस्ती केली आणि पकडले जाऊ या भीतीने तिची गळा घोटून आत्महत्या केली. त्यानंतर तिची ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा विद्रुप केला.
आयरिश-ब्रिटिश नागरिक डेनियल मॅकलॉगिनच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात आत्तापर्यंत गोव्याच्या कोर्टात निर्णय सुनावला जाणार आहे. सध्या आरोपी विकट भगत तुरुंगात आहे.