International Masters League 2025: क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर. भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांने अनेक विक्रम केले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जगात 100 शतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. पण 2013 मध्येच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता एक आनंदची बातमी आहे. आता सचिनची जादू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. एवढचं नाही तर सचिनला कर्णधारपद भूषवतानाही बघायला मिळणार आहे. सचिन आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये भारताचा कर्णधार असेल.
प्रथमच आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 22 फेब्रुवारी ते 16 मार्च दरम्यान मुंबई, वडोदरा आणि रायपूर या तीन ठिकाणी खेळवली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार असून त्यात भारत आणि श्रीलंका तसेच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. भारतीय मास्टर्स संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली, ज्यात विश्वचषक विजेता युवराज सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण या खेळाडूंचा समावेश आहे. एकंदरीत या स्पर्धेत अनेक जुन्या खेळाडूंना पुन्हा खेळताना बघता येणार आहे.
हे ही वाचा: स्टेडियम आहे की प्राणीसंग्रहालय? सामन्याच्या दरम्यान घुसले प्राणी-पक्षी; घटनेचे Video Viral
Three cities, endless action! Which showdown are you circling on your calendar? Let us know #IMLT20 #BaapsOfCricket https://t.co/S3i4sn5R7v
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) January 31, 2025
इरफान पठाणने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, "आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या पहिल्या सत्रात इंडिया मास्टर्स संघाचा भाग होण्यासाठी मी रोमांचित आहे. भूतकाळात सचिन तेंडुलकर आणि इतर सहकाऱ्यांसोबत खूप आनंदाचे आणि मौल्यवान क्षण घालवले जे खूप छान वाटते. श्रीलंका मास्टर्स संघाचा कर्णधार कुमार संगकारा आहे. या संघात माजी आक्रमक फलंदाज रोमेश कलुवितरण, वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल आणि सलामीवीर उपुल थरंगा यांचा समावेश आहे.