सुकेशचे जॅकलीनसाठी कोट्यवधींचे व्हॅलेंटाइन गिफ्ट, पत्र लिहित म्हणाला, 'मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम...'

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससाठी सुकेश चंद्रशेखर यानेदेखील व्हॅलेंटाइन गिफ्ट पाठवले आहे. तरुंगात असूनसुद्धा त्याने व्हॅलेंटाइन डेला जॅकलीनकडे आपलं प्रेम व्यक्त केले. सुकेशने जॅकलीनसाठी एक पत्रसुद्धा लिहिले. 

Updated: Feb 15, 2025, 11:14 AM IST
सुकेशचे जॅकलीनसाठी कोट्यवधींचे व्हॅलेंटाइन गिफ्ट,  पत्र लिहित म्हणाला, 'मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम...' title=

14 फेब्रुवारीला सर्वत्र व्हॅलेंटाइन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी सेलिब्रिटीजपासून ते सर्वसामान्य प्रेमी युगुलांनी आपलं प्रेम व्यक्त केलं. यादरम्यान, बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससाठी सुकेश चंद्रशेखर यानेदेखील व्हॅलेंटाइन गिफ्ट पाठवले आहे. सुकेश सध्या मंडोली जेलमध्ये आहे. मात्र, कारागृहात असूनसुद्धा त्याने व्हॅलेंटाइन डेला जॅकलीनकडे आपलं प्रेम व्यक्त केले. सुकेशने जॅकलीनसाठी एक पत्र लिहिलं आणि त्यासोबत एक महागडं गिफ्टसुद्धा पाठवलं.  त्याने जॅकलीनला कस्टमाइज्ड गल्फस्ट्रीम जेट भेट म्हणून दिला आहे. पत्रात त्याने जॅकलीनसाठीचं आपलं प्रेम व्यक्त करत आपल्या मनातल्या भावना सांगितल्या आहेत.

सुकेशने जॅकलीनसाठी लिहिले पत्र

सुकेशनं जॅकलीनला आपलं व्हॅलेंटाइन म्हणत, पत्राची सुरुवात केली आहे. त्याने पत्रात लिहिले, "यावर्षीचा व्हॅलेंटाइन डे आपल्यासाठी खास आणि वेगळा आहे. कारण दरवर्षीप्रमाणे आपण एकमेकांच्या जवळ नसून काही अंतर दूर आहोत. सगळ्यात आधी तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू जगातील सगळ्यात बेस्ट व्हॅलेंटाइन आहेस आणि मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो. आपल्या प्रेमाची सुरूवात व्हॅलेंटाइन डेपासूनच झाली होती म्हणून हा दिवस आपल्या दोघांसाठी खूपच खास आहे."

जेटवर लिहिले जॅकलीनच्या नावाचे इनिशियल्स

सुकेश आणि जॅकलीन या दोघांच्या प्रेमाची सुरूवात व्हॅलेंटाइन डेपासून झाली होती म्हणून हा दिवस सुकेशसाठी खास असल्याचं त्याने पत्रात सांगितलं. तसेच, या खास दिवशी जॅकलीनसाठी एक खास आणि मोठं सरप्राइज गिफ्ट पाठवलं आसल्याचंदेखील त्याने आपल्या पत्रात लिहिलं. सुकेशने जॅकलीनसाठी तिच्या नावाचं इनिशियल असलेलं एक मोठं गलस्ट्रीम जेट भेट म्हणून दिलं आहे. तसेच, या जेटचा रजिस्ट्रेशन नंबर जॅकलीनच्या जन्म तारीखेशी निगडीत असल्याचं सुकेश पत्रात म्हणाला.

हे ही वाचा: Chhaava Box Office Collection Day 1 : 'छावा' ने मोडले अनेक रेकॉर्ड, वर्षातील सगळ्यात मोठी ओपनिंग

 

 

जॅकलीन आणि सुकेशचं प्रकरण

सुकेश हा 2015 पासून एका केसच्या संबंधित आरोपाखाली जेलमध्ये आहे. या केसच्या तपासात सुकेश आणि जॅकलीन एकमेकांना डेट करत असल्याची बाब समोर आली. सुकेशने स्वत: याबद्दल सांगितलं होतं. यादरम्यान सुकेश आणि जॅकलीनचे बरेच फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. जॅकलीनने सुकेशने सांगितलेल्या या गोष्टींना दुजोरा न देता त्याने तिला धोका दिल्याचं सांगितलं. यासोबतच जॅकलीनने सुकेशवर तिला घाबरवण्याचा आणि धमकावण्याचा आरोप केला.