Mahashivratri 2025 : भारतात, महाराष्ट्रात आतापर्यंत अनकदा गतकाळातील जीवनसंस्कृती कैक निमित्तानं जगासमोर आल्या. पुरातन मंदिरं असो किंवा मग मानवी उत्क्रांतीच्या अतिशय सुरुवातीच्या दिवसांमधील काही संदर्भ असो. पुरातत्तंव खात्यानं कायमच काही भारावणारे संदर्भ समोर आणले आणि गतकाळातील संस्कृती किती समृद्ध होती हेच दाखवून दिलं. आता पुन्हा एकदा गतकाळातील याच संस्कृतीत डोकावण्याची अद्भूत संधी सर्वांनाच मिळाली असून, भिवंडीतील एका घटनेनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काही दिवसांवर महाशिवरात्री सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भिंवडी तालुक्यातील वाहुली गावा लगतच्या पांडवगडावरील पांडवकुंडात पुरात शिवलिंग सापडलं. पांडवकुंडाच्या स्वच्छतेचं काम सुरु असताना हे शिवलिंग सापडलं. कुंडाच्या तळाशी पुरातन शिवलिंग आणि पादुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे परिसारीतल शिवभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी शिवरूपानंद स्वामी आणि माधव महाराज भोईर यांनी तिर्थाला पांडूकेश्वर नावाने ओळखले जावे असे घोषित केले. यावेळी देवाचा गजर करत शिवनामाचा जयघोष देखील करण्यात आला.
शिवलिंग सापडल्याची बातमी या भागात वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि परिसरातील अनेकांनीच हे शिवलिंग पाहण्यासाठी पांडवगडावर धाव घेतली. यंदाच्या शिवरात्रीला या ठिकाणी १११ महारुद्र जलाभिषेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच शिवलिंग सापडल्यानं यंदा भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचे मत यावेळी योगेश गायकर यांनी व्यक्त केलं.
भविष्याच पांडूकेश्वर हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास येईल अशी भावना इथं स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. किंबहुना या ऐतिहासिक शोधामुळं गडाचं अध्यात्मिक महत्त्वं वाढलं असून, यामुळं पर्यटनासही वाव मिळू शकतो असं म्हटलं जात आहे.