कधी सुष्मिता सेन तर कधी अजून कोणी, अखेरीस माजी IPL बॉसला मिळाले नवीन प्रेम; 25 वर्षांपासूनच्या मैत्रिणीला केले प्रपोज

EX IPL Boss Lalit Modi: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पहिल्या अध्यक्षांनी ललित मोदी यांनी गुरुवारी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. त्यांना नवीन प्रेम मिळाले आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 15, 2025, 08:45 AM IST
कधी सुष्मिता सेन तर कधी अजून कोणी, अखेरीस माजी IPL बॉसला मिळाले नवीन प्रेम; 25 वर्षांपासूनच्या मैत्रिणीला केले प्रपोज  title=
Photo credit: @lalitkmodi/ Instagram

EX IPL Boss Lalit Modi Love Life: इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) पहिले अध्यक्ष म्हणजे ललित मोदी. ललित मोदींचे नाव अगदी सगळ्यांचं माहिती आहे. ललित मोदी यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने गुरुवारी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. त्याला नवीन प्रेम मिळाले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याने याचाच खुलासा केला. ललित मोदींनी सांगितले की, 'मला पुन्हा प्रेम मिळाले आहे.' याशिवाय त्यांनी त्याची नवीन मैत्रीण रीमा बौरीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या 61 वर्षीय व्यावसायिकाच्या खुलाशामुळे लोकांना धक्का बसला आहे. या पोस्टमुळे बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ब्रेकअप झाल्याचीही चर्चा होत आहे. 

सोशल मीडियावर प्रेमाची दिली कबुली 

इंस्टाग्रामवर अनेक फोटोंचा व्हिडीओ शेअर करत ललित मोदींनी लिहिले, "लकी वन्स, होय. पण मी दोनदा भाग्यवान झालो. जेव्हा 25 वर्षांची मैत्रीचे प्रेमात बदलते. असे दोनदा झाले. आशा आहे की ते तुमच्यासाठी देखील असेल. तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा."  आपल्या पोस्टवर कमेंट करताना रीमाने लिहिले की, ‘लव यू मोअर’ त्यांच्या कमेंटला उत्तर देताना ललित मोदी यांनी ‘माझे कायमचे प्रेम’ असे लिहिले.

 हे ही वाचा: धक्कादायक! एका दिवसात दोन देशांमध्ये खेळला सामना, कोण आहे हा खेळाडू?

 

रीमा काय करते?

रीमाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, रीमा लेबनॉनमध्ये स्थित एक स्वतंत्र सल्लागार आहे. ती मार्केटिंग फिल्डमध्ये आहे. ललित मोदींनी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला काही काळ डेट केले होते. 2022 ने तिला  इंस्टाग्राम पोस्टमध्ये 'बेटर हाफ' असे म्हटले होते. परंतु आयपीएलच्या माजी अध्यक्षांनी नंतर एका वेगळ्या ट्विटमध्ये सर्व काही स्पष्ट केले. दोघांनी लग्न केलेले नाही आणि फक्त एकमेकांना डेट करत असल्याचे त्याने सांगितले होते.

 

 हे ही वाचा: Jasprit Bumrah Net Worth: पैसा ही पैसा... आलिशान घरांपासून महागड्या गाड्यांपर्यंत; बुमराहची नेट वर्थ माहितेय?

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

 

हे ही वाचा: "इतके षटकार कोण मारतं भाऊ...?" 'या' भारतीय क्रिकेटपटूने ख्रिस गेलला टाकले मागे, यादीत 'हा' पाकिस्तानी खेळाडू अव्वल

ललित मोदीने सोडला देश 

याआधी ललित मोदी यांचे मीनल संगराणीसोबत २७ वर्षे लग्न होते. 2018 मध्ये मीनलचा दीर्घ आजारानंतर कर्करोगामुळे मृत्यू झाला. या जोडप्याला आलिया आणि रुचिर ही दोन मुले होती.करचोरी आणि मनी लाँड्रिंगच्या चौकशीदरम्यान ललित मोदीने २०१० मध्ये भारत सोडला. तेव्हापासून तो लंडनमध्ये आहे. 2013 मध्ये, भारतीय बोर्डाने त्याला दोषी ठरवल्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घातली.