गर्भधारणा रोखण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्स घेताय? 25 कोटी महिलांचं आरोग्य धोक्यात

Contraceptive Risk: अवेळी गर्भधारणा रोखण्यासाठी अनेक महिला अनेकदा गर्भनिरोधकांचा वापर करतात. गर्भनिरोधकांचा वापर कितपत योग्य? धोका आहे पण त्याचं गांभीर्य जाणून खडबडून जागे व्हाल  

सायली पाटील | Updated: Feb 15, 2025, 02:17 PM IST
गर्भधारणा रोखण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्स घेताय? 25 कोटी महिलांचं आरोग्य धोक्यात  title=
health news Child Birth Control method Contraceptive is Not Safe For 25 Crore Women haing heart attack stroke Risk

Contraceptive Risk: अवेळी गर्भधारणा रोखण्यासाठी अनेक महिला अनेकदा गर्भनिरोधकांचा वापर करतात. मुळात गर्भधारणा रोखण्यासाठी एक नव्हे अनेक पर्याय जगभरात वापरले जात असले आणि हे पर्याय कितीही सामान्य असले तरीही त्यात असणारा धोका मात्र नाकारता येत नाही हेच आता स्पष्ट झालं आहे. याआधीसुद्धा अनेकदा गर्भनिरोधकांचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम अधोरेखित करण्यात आला असला तरीही त्याकडे बऱ्याच अंशी दुर्लक्ष झाल्याचच लक्षात आलं आहे. 

डेन्मार्कमध्ये हल्लीच करण्यात आलेल्या एका निरीक्षणपर अध्ययनातून याबाबतची माहिती समोर आली. या अध्ययनानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार हार्मोनल कॉन्ट्रसेप्टीव, ज्यामध्ये अॅस्ट्रोजनचा समावेश असतो अशा गर्भनिरोधकांमुळं हदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो असा दावा करण्यात आला आहे. सदर निरीक्षणासाठी 20 लाखांहून अधिक महिलाच्या आरोग्याचा आढावा घेण्यात आला. ज्यानंतर नॉन ओरल कंबाइंड कॉन्ट्रासेप्टिव्स, वजाइनल रिंग, स्किन पॅच सर्वाधिक धोकादायक आहेत. 

जगभरातील महिलांचा आढावा घ्यायचा झाल्यास जवळपास 250  मिलियन महिला हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्सवर अवलंबून आहेत. द बीएमजे (The BMJ) मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार महिलांच्या गर्भनिरोधक घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. संशोधक आणि अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार वैद्यकिय सल्लागार किंवा डॉक्टरांनी अशा गर्भनिरोधकांची चिठ्ठी देताना समोरील व्यक्तीला संभाव्य धोक्याचीही कल्पना द्यावी. 

अहवालासाठी जाणकारांनी 1996 ते 2021 दरम्यान 15-49 वयोगटातील 20 लाखांहून अधिक डॅनिश महिलांचं निरीक्षण करत नॅशनल प्रिस्क्रप्शन रेकॉर्ड ट्रॅक केला. जिथं, कंबाइंड एस्ट्रोजन-प्रोजेस्टिनच्या गोळ्या, वजाईनल रिंग, पॅच प्रोजेस्टिन-ओनली पिल्स अंतर्गर्भाशयी डिवाइजचा समावेश होता. कर्करोग, यकृताचे आजार, पीसीओएस, वंध्यत्त्वाचे उपचार अशा औषधांवर असणाऱ्या महिलांना या निरीक्षणातून वगळण्यात आलं होतं. 

हेसुद्धा वाचा :Alert! खिडक्या बंद ठेवा... मुंबईत उष्णतेची लाट आणखी तीव्र 

हा एक निरिक्षणपर अहवाल असल्यामुळं त्यातून अंतिम निष्कर्ष काढण्यात आला नाही. गर्भनिरोधकांनी होणारे आहार दुर्धर असले तरीही त्याच्या अतीव वापरानं उदभवणारा धोका मात्र इथं नाकारता येत नाही असंही निरिक्षणकर्त्यांनी स्पष्ट केलं. 

(वरील माहिती निरीक्षणपर संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खाजरजमा करत नाही.)