Juuhi Babbar on Brother Prateik's Wedding : बॉलिवूड अभिनेता राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरनं गर्लफ्रेंड प्रिया बनर्जीशी लग्न केलं आहे. पण त्या दोघांच्या लग्नाला प्रतीकच्या कुटुंबातून कोणी आलं नव्हतं. महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबाला प्रतीकनं आमंत्रण दिलं नव्हतं. त्यावर त्याचा सावत्र भाऊ आर्य बब्बरनं वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्यानंतर आता त्याची सावत्र बहीण जूही बब्बरनं देखील या प्रकरणात तिचं मत मांडलं आहे. ती आर्याची बाजू घेत नसून पण नक्कीच त्याला फार वाईट वाटलंय. जेव्हा केव्हा कोणाला त्रास होतो तेव्हा ते असेच वागतात. हा खरंच खूप हृदयाच्या जवळचा विषय आहे. तो प्रतीकच्या जन्माच्या आधी देखील असाच होता. पण काही झालं तरी प्रतीक माझा भाऊ आहे आणि जगातली कोणतीही गोष्ट हे बदलू शकत नाही. कारण आमचे वडील एकच आहेत.
जूहीनं हे देखील सांगितलं की प्रतीकच्या जवळपास असलेल्या काही लोकांनी कुटुंबापासून लांब राहायला सांगितलं असेल. जुही म्हणाली, 'सध्या त्याच्या आजुबाजूला काही ठरावीक लोकं आहेत, ज्यांच्या बोलण्यात तो आलाय, आम्हाला त्यांची नावं घ्यायची नाहीत. आम्हाला त्या सगळ्यात अडकायचं नाही. कारण त्यामुळे कोणाचा फायदा होणार नाही आहे. जेव्हा मी सॅन्डविच बोलते, तर त्याचा अर्थ हा नाही की प्रतीक प्रिया आणि आमच्यात अडकला आहे. असं मुळीच नाही. प्रिया खूप चांगली आणि गोड मुलगी आहे आणि ती खूप नशिबवान आहे की तिला एक असा साधीदार मिळाला आहे, जो तिच्यावर खूप प्रेम करतो आणि त्यासोबत तिला समजूनही घेतो.'
जूही बब्बरनं पुढे सांगितलं की 'खरं सॅन्डविचिंग दुसऱ्या गोष्टीमुळे होतंय. कोणी अशी व्यक्ती जी प्रचार करण्यासाठी तयार आहे. प्रत्येकाला माहित आहे की माझी आई (नादिरा बब्बर) कायम प्रतीकसोबत राहिली आहे. त्यांच्यात इतकं चांगलं बॉन्ड आहे की लोकांना भीती वाटते, त्यांना वाटतं की त्याच्या महत्त्वाच्या दिवशी आम्ही तिथे काही गोंधळ घालू. भाऊ, बहीण किंवा वडील कोणत्याही प्रकारची पब्लिसिटी कशी घेतील? आम्हाला फक्त इतकंच हवं आहे की माझा भाऊ शांत आणि आनंदी राहू देत. आमच्यासाठी फक्त हेच महत्त्वाचं आहे.'
या मोठ्या कार्यक्रमाचा भाग न झाल्यानं जूहीनं यावर वक्तव्य केलं आहे की कोणताचा दुरावा किंवा राग नाही. जूही म्हणाला, 'त्याला त्याच्या पहिल्या लग्नात वाईट अनुभव आला आणि त्यामुळे त्यानं दुसऱ्यांचा लग्न करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. आम्हाला त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर द्यायचा नाही. लग्न कार्यक्रमात सगळ्या कुटुंबांमध्ये चर्चा होते. त्याचं पहिलं लग्न हे भव्य होतं. आम्ही खूप नाचलो आणि जेव्हा त्याचं लग्न मोडलं, तेव्हा आमचे वडील त्याच्यासोबत होते आणि त्यावेळी त्यांनी त्याची मदत केली होती. आमच्याकडून कोणत्याही प्रकारची अडचण नाही.'
हेही वाचा : 'मी हैदराबादची...' म्हणताच रश्मिका मंदानावर कानडी भडकले, नेमकं काय घडलं?
पुढे याविषयी सांगत जूही बब्बर म्हणाली, 'सध्या या सगळ्या गोष्टी तो त्याच्या पद्धतीनं सांभाळतोय. तो स्वत: ला शोधतोय. आई-वडील आणि आम्ही सगळे त्याची परिस्थिती समजतोय. कुटुंबाचं सगळ्यात मोठं काम म्हणजे मुलांना सांभाळणं आहे. यावेळी आम्ही मिठाई वाटली नसेल, पण त्याच्यासोबत आनंद साजरा करण्याचे आणखी अनेक क्षण येतील. अनेकवेळा संधी मिळेल, तेव्हा आम्ही मिठाई देखील खाऊ, नाचू आणि मग फोटो देखील शेअर करू. सध्या आम्ही त्याला जाऊ देतोय.'