चित्रपटसृष्टीत असे काही कलाकार आहेत, ज्यांना अभिनयाची शिकवण ही त्यांच्या पालकांकडून मिळाली. पालकांप्रमाणे मुलीने देखील चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव आहे ट्विंकल खन्ना. ट्विंकल खन्नाने आई-वडील सुपरस्टार होते. दोघांनी अनेक वर्षे बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य केलं. मात्र, त्यांच्या मुलीने चित्रपट करिअर फ्लॉप ठरले. इतकच नाही तर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडमधील सुपरस्टार कलाकारांसोबत काम केलं आहे. ज्यामध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांचा समावेश आहे. परंतु, तिची कारकिर्द अपयशी ठरली.
ट्विंकल खन्नाने बॉबी देओलसोबत 'बरसात' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तिचा हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तिला पहिल्याच चित्रपटात यश मिळाले. यानंतर अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, तिला मोठ्या प्रमाणात यश मिळाले नाही. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक फ्लॉप चित्रपट दिले. त्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न केले. लग्नानंतर ती इंडस्ट्रीपासून दूर राहिली.
अभिनेत्रीने तिन्ही खानसोबत केलंय काम
हिट चित्रपट देणाऱ्या शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबत अभिनेत्रीने काम केलं आहे. सलमान खानसोबत ट्विंकल खन्नाने 'प्यार किसी से होता है' या चित्रपटामध्ये काम केलं आहे. हा चित्रपट हिट ठरला होता. तर शाहरुख खानसोबत अभिनेत्रीने 'बादशाह' या चित्रपटामध्ये काम केलं. आमिर खानसोबत 'मेला' चित्रपटात ट्विंकल खन्ना दिसली होती. परंतु, तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता.
अभिनयापासून दूर झाल्यानंतर अभिनेत्री ट्विंकल खन्नाने इंटीरियर डिझायनिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ती लेखक बनली. ज्यामधून ती खूप प्रसिद्ध झाली. एका रिपोर्टनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 350 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्या वडिलांनी त्यांची अफाट संपत्ती तिच्या नावावर केली होती. आता ती सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी आहे. आता ती हजारो कोटी रुपयांची मालकीण आहे.