आंघोळीशिवाय आपण बाहेर पडत नाही. महिला तर सकाळी सकाळी आंघोळ करुनच घरातील कामाला सुरुवात करतात. हिंदू धर्मात आंघोळीला विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय आंघोळसाठी शास्त्रात काही नियम देखील सांगितले आहेत. पण आंघोळी करताना काही चुका जर तुम्ही केल्यास वेळीपूर्वीच तुम्हाला म्हातारपण येण्याची शक्यता असते, असं तज्ज्ञ सांगतात. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, आंघोळ करताना काही चुका हे तुमचं नुकसान करु शकतं. तुम्ही तर या चुका करत नाहीत ना जाणून घ्या. नाही तर कमी वयात म्हातारे दिसू शकता.
काही लोकांना गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते किंवा त्यांना आवडतं. हे खूप आरामदायी असून विशेषतः हिवाळ्यात, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला चांगली उष्णता आणि थंडावा प्राप्त होतो. मात्र जास्त काळ गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेचे मोठे नुकसान होतं. त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट होतं. ज्यामुळे ती कोरडी आणि निस्तेज वाटू लागते. त्याचा परिणाम म्हणजे कमी वयात तुमच्या शरीरावर वृद्धत्वाची अकाली चिन्हे जाणवू लागतात. त्यामुळे आंघोळ कोमट पाण्याने करावी आणि जास्त वेळ करु नयेत.
आजकाल आंघोळीसाठी मार्केटमध्ये वेगवेगळे साबण किंवा बॉडी वॉश उपलब्ध आहेत. हे साबण आणि बॉडी वॉश तीव्र आणि अतिशय सुंगधीत असतात. त्या जास्त प्रमाणात वापर केल्यास त्वचेचे नुकसान होतं. खरं तर, बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक साबणांमध्ये आणि बॉडी वॉशमध्ये अनेक कठोर रसायने आणि सुगंध वापरले जातात. तुमच्या शरीरातील घाण साफ करण्यात मदत तर होते पण, ते शरीरातील नैसर्गिक तेले काढून टाकण्याचे काम करतात. त्यांचा जास्त काळ वापर केल्याने त्वचा खूप कोरडी आणि निस्तेज दिसायला लागते.
जर तुम्ही आंघोळीनंतर तुमची त्वचा कोरडी केल्यानंतर ती अशीच सोडून दिली तर तुमच्या त्वचेच नुकसान होतं. आंघोळ केल्यानंतर, त्वचा पूर्णपणे कोरडी करुन लगेच चांगले मॉइश्चरायझर लावलं नाही तर समस्या निर्माण होऊ शकते. कठोर आणि रासायनिक-आधारित मॉइश्चरायझर्स वापरण्याऐवजी, नारळ तेल, ऑलिव्ह तेल, जोजोबा तेल किंवा तीळ तेल यांसारखे नैसर्गिक तेल वापरल्यास त्वचा मॉइश्चरायझ होते. यामुळे तुमची त्वचा दीर्घकाळ निरोगी आणि चमकदार राहण्यास फायदेशीर ठरते.
आंघोळ करताना चेहरा पूर्णपणे धुणे ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या चेहऱ्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि ती निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी चेहरा धुणे गरजेचे आहे. मात्र, जर तुम्ही जास्त वेळ चेहरा धुतलात तर ते तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला नुकसान होतं. बराच वेळ चेहरा धुतल्याने त्वचेतील नैसर्गिक तेले निघून जातं. शिवाय त्वचा आतून निस्तेज आणि कोरडी दिसायला लागते. अशा परिस्थितीत, चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे खूप लवकर दिसायला लागतात.
आंघोळीनंतर शरीर पूर्णपणे पुसण्यासाठी प्रत्येकजण टॉवेलचा वापर करतात. मात्र, ते वापरताना काही काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा ते त्वचेसाठी हानिकारक ठरतं. शरीर पुसण्यासाठी नेहमी स्वच्छ टॉवेलचा वापर केला पाहिजे. टॉवेल मऊ कापडाचा असणे गरजेच आहे. याशिवाय, शरीर पुसताना त्वचेला जोरात घासू नयेत. हलक्या हातांनी टॉवेलने शरीर हळूवारपणे पुसून तो रोज धुवायला टाकावा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)